आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्सला सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर झालेल्या या दारुण पराभवानंतर कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा चांगलाच संतापला. एरवी शांत राहणाऱ्या रहाणेने यावेळी टीकाकारांवर परखड शब्दात प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले.
स्पर्धेत कोलकाता नाईटरायडर्सला सलग दुसरा पराभव पत्करावा लागल्यानंतर, अजिंक्य रहाणेला स्ट्राईक रेट, सलामीवीराचा भूमिका आणि फलंदाजीच्या शैलीवरून पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी अजिंक्य रहाणे म्हणाला की, 'टीकाकार सामना न पाहताच आपलं मत बनवतात. मला जेवढं यश मिळालं आहे, ते पाहून लोक कदाचित जळत असावेत. मी याची चिंता करत नाही. एका डावाने काही होत नाही. माझा इरादा योग्य होता. मात्र कधी कधी लय सापडत नाही. लोक मला वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहू इच्छितात. मात्र मी माझ्या शैलीवर विश्वास ठेवतो. बाकी सकारात्मक असो वा नकारात्मक लोक माझ्याबाबत चर्चा करत आहेत, ही चांगली बाब आहे', असा टोलाही त्याने लगावला.
आयपीएलमधील आपल्या स्ट्राईक रेटबाबत अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला की, '२०२३ पासून माझा स्ट्राईक रेट हा सर्वात चांगल्या स्ट्राईक रेटपैकी एक आहे. जे लोक माझ्याबाबत बोलत आहेत, ते कदाचित सामना पाहत नाहीत किंवा हा माझ्याविरोधात चालवणा जाणारा अजेंडा आहे. त्यांना कदाचित मला खेळताना पाहणं आवडत नसावं'. दरम्यान, स्ट्राईक रेटच्याबाबतीत अजिंक्य रहाणे याने आपल्याबाबत केलेले आकडेवारीमधून सिद्ध होतात. २०२३पासून पॉवर प्लेमध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा १६७.७८ एवढा राहिलेला आहे. यादरम्यान, किमान ३०० चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये ट्रॅव्हिस हेड (१८७.९८), अभिषेक शर्मा (१७६.५६) आणि फिल साल्ट (१७३.८) यांचा स्ट्राईक रेट रहाणेपेक्षा चांगला राहिलेला आहे. मात्र ७ ते १५ या मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाज अजिंक्य रहाणेसाठी डोकेदुखी ठरले आहेत. तसेच या षटकांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा कमी होऊन ११४.०२ एवढा राहिला आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत अजिंक्य रहाणे हा १० चेंडूत ८ धावा काढून बाद झाला होता.
Web Summary : After KKR's loss, captain Rahane criticized critics, saying they're jealous of his success. He defended his strike rate, highlighting his powerplay performance since 2023, despite struggles against spin. He insists on trusting his style.
Web Summary : केकेआर की हार के बाद, कप्तान रहाणे ने आलोचकों की आलोचना की, कहा कि वे उनकी सफलता से जलते हैं। उन्होंने 2023 से अपने पावरप्ले प्रदर्शन को उजागर करते हुए अपनी स्ट्राइक रेट का बचाव किया, हालांकि स्पिन के खिलाफ संघर्ष किया। उन्होंने अपनी शैली पर भरोसा करने पर जोर दिया।