KKR vs SRH Harsh Dubey Dismissed Finn Allen : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं दिलेल्या विक्रमी २२७ धावसंख्येचा पाठलाग करताना फिन ॲलन याने कोलकाता नाईट रायडर्सला कडक सुरुवात करुन दिली. न्यूझीलंडच्या स्फोटक फलंदाजाने पहिल्या षटकात २४ धावा कुटल्या. यासह त्याने खास विक्रमही नोंदवला. पण त्याचा हा रुबाब विदर्भकरासमोर चालला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विदर्भकराची कमाल! फिन ॲलनचा दुसऱ्याच चेंडूवर घेतला बदला
डेविड पायनेची धुलाई झाल्यावर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार ईशान किशन याने चेंडू विदर्भकर हर्ष दुबेच्या हाती सोपवला. अंजिक्य रहाणेनं एकेरी धाव घेत फिनला स्ट्राइक दिले. त्याने हर्षचं स्वागतही खणखणीत चौकाराने केले. पण त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर हर्षनं त्याला स्वत:च्या गोलंदाजीवर एक सुरेख झेल टिपत तंबूचा रस्ता दाखवत चौकाराचा बदला घेत संघाला मोठा दिलासा देणारी विकेट मिळवून दिली. केकेआरच्या सलामीवीरानं ७ चेंडूत ४०० च्या स्ट्राईक रेटनं २८ धावा कुटल्या.
काव्या मारनच्या SRH चा 'जानी दुश्मन' झाला आहे थर्ड अंपायर? आता अभिषेक शर्माच्या विकेटवरून नवा वाद
पहिल्याच षटकात तुफान फटकेबाजीचा खास विक्रम
फिन ॲलन हा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्याने आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर पोहचला. त्याने पृथ्वी शॉची बरोबरी केली. ज्याने २०२१ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायड्रस विरुद्धच्या सामन्यात पहिल्या षटकात २४ धावा कुटल्या होत्या. या यादीत यशस्वी जैस्वाल अव्वस्थानी आहे. २०२३ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध IPL मध्ये १३ चेंडूत जलद अर्धशतक झळकावताना त्याने पहिल्या षटकात २६ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
गत हंगामात बदली खेळाडूच्या SRH संघात एन्ट्री आता...
सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील अष्टपैलू हर्ष दुबे हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाचे प्रतिनिधीत्व करतो. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने खास छाप सोडली आहे. कोलकाताच्या संघातील स्फोटक फलंदाजासमोर त्याने अप्रतिम गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातील धमकही दाखवून दिली. गत हंगामात ३० लाख या मूळ किंमतीसह हर्ष दुबे सनरायझर्स संघात आला. यंदाच्या हंगामा त्याला याच किंमतीही काव्या मारनच्या संघाने त्याला संघात कायम ठेवले आहे. यंदाच्या हंगामात त्याला अधिकाधिक संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.