कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि युवा बॅटर अंगकृष रघुवंशी या दोन मुंबईकरांनी लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या घरच्या मैदानातील सामन्यात तगडी भागीदारी करत अनुभव आणि युवा जोश याची खास झलक दाखवून दिली. या सामन्यात दोघांचेही अर्धशतक हुकले. पण त्यांनी ८४ धावांच्या भागीदारीसह संघाचा डाव सावरणारी उपयुक्त खेळी केली. यादरम्यान अजिंक्य रहाणेनं मारलेला षटकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आवेश खानच्या गोलंदाजीवर बॅट हातून निसटल्यावरही त्याने मारलेला चेंडू थेट सीमारेषेबाहेर जाऊन पडला. त्याचा हा षटकार पाहून समालोचकांसह क्रिकेट चाहतेही आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रहाणेचा भन्नाट सिक्स; बॅट हातातून सुटली तरी चेंडू सीमारेषेबाहेर!
बऱ्याच दिवसांपासून टीम इंडिया बाहेर असलेला आणि कसोटीपटू अशी ओळख असलेला अजिंक्य रहाणे टी-२० क्रिकेटमध्ये एका वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या भात्यातील खास फटकेबाजीचा नजराणा पेश केला. कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील नवव्या षटकात आवेश खान गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणे याने जोरदार फटका खेळला. त्याच्या हातून बॅट निसटून ती स्क्वेअर लेगकडे जाऊन पडली. पण त्याच्या फटक्यात इतकी ताकद इतकी होती की, चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या सीमारेषेबाहेर जाऊन षटकार ठरला.
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
रहाणे-रघुवंशीचा जलवा
सलामीवीर फिन ॲलन स्वस्तात आटोपल्यावर रहाणे-रघुवंशी जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ चेंडूत ८४ धावांची भागीदारी रचली. अजिंक्य रहाणेनं १७० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटसह २४ चेंडूत ४१ धावा केल्या. या खेळीत त्याने २ षटकारांसह ५ खणखणीत चौकार मारले. रघुवंशीनं ३३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४५ धावांची खेळी केली.
अखेरच्या षटकात कॅमरून ग्रीन- रोव्हमन पॉवेलची उपयुक्त भागीदारी
अखेरच्या षटकात कॅमरून ग्रीन आणि रोव्हमन पॉवेल या जोडीनं ४० चेंडूत ७० धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर निर्धारित २० षटकात ४ बाद १८१ धावा लावल्या. ग्रीनने २४ चेंडूत ३२ तर रोव्हमन पॉवेल याने २४ चेंडूत ३९ धावांची नाबाद खेळी केली.
Web Summary : Ajinkya Rahane's powerful six against LSG, where the bat slipped mid-shot, became a viral sensation. His and Raghuvanshi's partnership stabilized KKR's innings after Allen's quick dismissal. Green and Powell added crucial runs late, boosting KKR to 181/4.
Web Summary : LSG के खिलाफ अजिंक्य रहाणे का शक्तिशाली छक्का वायरल हो गया। रहाणे और रघुवंशी की साझेदारी ने एलन के जल्दी आउट होने के बाद केकेआर की पारी को संभाला। ग्रीन और पॉवेल ने अंत में महत्वपूर्ण रन जोड़े, जिससे केकेआर 181/4 तक पहुंच गया।