सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)

किंग चार्ल्स (III) यांच्यासोबत टीम इंडियातील खेळाडूंचे खास फोटो सेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:39 IST2025-07-15T19:50:51+5:302025-07-15T20:39:58+5:30

whatsapp join usJoin us
King Charles III Met The Players Of Indian Men's and Women's Cricket Team Coach Staff Members And BCCI Officials at St. James's Palace In London | सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)

सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानातील कसोटी सामन्यानंतर भारतीय पुरुष संघासह महिला संघातील खेळाडू आणि ब्रिटनचे किंग चार्ल्स (तृतीय) यांच्यातील भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि स्टाफ सदस्यांसह बीसीसीआयचे अधिकाऱ्यांनी लंडन येथील सेंट जेम्स पॅलेस येथे किंग चार्ल्स (III) यांची भेट घेतली. या भेटीत सिराजच्या विकेटची चर्चा ब्रिटन घराण्यापर्यंत पोहचल्याचेही स्पष्ट झाले. कर्णधार शुबमन गिलनं यासंदर्भातील खास गोष्ट शेअर केली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

किंग चार्ल्स (III) यांच्यासोबत टीम इंडियातील खेळाडूंचे खास फोटो सेशन

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल, उप कप्तान रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि मुख्य कोच गौतम गंभीर यांच्यासह बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लाही या भेटीसाठी सेंट जेम्स पॅलेसमध्ये उपस्थितीत होते. भेटीनंतर भारतीय पुरुष आणि महिला संघातील खेळाडूंसह ब्रिटनचे किंग चार्ल्स (तृतीय) यांच्यासोबत खास फोटो सेशनही केले. 

या खास भेटीनंतर काय म्हणाला शुबमन गिल?



किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीनंतर भारतीय संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. शुबमन गिल या भेटीसंदर्भात म्हणाला की, किंग चार्ल्स III यांनी खास भेटीसाठी निमंत्रण दिले, ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या भेटीत चार्ल्स यांनी  सिराजच्या विकेटवर भाष्य केल्याचेही गिलने सांगितले. सिराज दुर्देर्वीरित्या बाद झाला, असे ते म्हणाले.
 

हरमनप्रीत ब्रिगेडच्या खेळाचं कौतुक, आकाशदीपच्या बहिणीच्या तब्येतीची विचारपूस

हरमनप्रीत कौर या ग्रेट भेटीवर म्हणाली की, किंग चार्ल्स (III) यांच्या भेटीचा अनुभव एकदम खास होता. ते खूपच फ्रेंडली नेचर असणारे व्यक्तीमत्व वाटले. आमच्या खेळाचे त्यांनी कौतुक केल्याची गोष्टही हरमनप्रीत कौरनं सांगितली आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही एक ऐतिहासिक भेट होती, असे म्हटले आहे. एवढेच नाहीतर संवाद साधत असताना किंग चार्ल्स यांनी आकाशदीपच्या बहिणीची विचारपूस केली. जी सध्या कॅन्सरशी लढा देत आहे.
 

Web Title: King Charles III Met The Players Of Indian Men's and Women's Cricket Team Coach Staff Members And BCCI Officials at St. James's Palace In London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.