Join us  

CPL 2021 : किरॉन पोलार्ड सुसाट खेळला, शाहरूखच्या संघाला विजय मिळवून दिला; आनंद मात्र मुंबई इंडियन्सला झाला

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून म्हणजेच आता अवघ्या ६ दिवसांत सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 11:01 AM

Open in App
ठळक मुद्देकर्णधार ड्वेन ब्राव्हो यानं १३ चेंडूंत २५ धावा चोपून संघाच्या धावसंख्येत हारभार लावला. पण, त्यानं मागील दोन सामन्यांत गोलंदाजी केलेली नाही. तो दुखापतीतून सावरलेला नाही

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून म्हणजेच आता अवघ्या ६ दिवसांत सुरूवात होणार आहे. जवळपास सर्वच संघ महिनाभर आधीच युएईत दाखल झाले आहेत आणि काही खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2021) नुसता धुरळा करत आहेत... मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का असलेल्या किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) रविवारी २० चेंडूंत वादळी खेळी करताना शाहरूख खान याच्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. पण, मुंबई इंडियन्सला भारी आनंद झाला. तेच दुसरीकडे याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढवणारी बातमीही समोर आली आहे.

त्रिनबागो नाइट रायडर्स ( Trinbago Knight Riders)  विरुद्ध सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts and Nevis Patriots) यांच्यातल्या सामन्यात पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रायडर्सनी ४ विकेट्स व ६ चेंडू राखून विजय मिळवला. सेंट किट्सनं प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १४७ धावा केल्या. जोशूआ डी सिल्वानं ४५ चेंडूंत ५० धावा ( ५ चौकार व १ षटकार) केल्या. शेर्फाने रुथरफोर्ड ( २५) व कर्णधार ड्वेन ब्राव्हो यानं १३ चेंडूंत २५ धावा चोपून संघाच्या धावसंख्येत हारभार लावला. पण, त्यानं मागील दोन सामन्यांत गोलंदाजी केलेली नाही. तो दुखापतीतून सावरलेला नाही आणि आयपीएलच्या तोंडावर चेन्नई सुपर किंग्ससाठी ही चिंता वाढवणारी गोष्ट ठरू शकते. ( Dwayne Bravo scored 25 runs from just 13 balls against TKR but he is yet to ball in the last 2 matches, hopefully a good recovery going on and bowl for CSK in IPL 2021.)

प्रत्युत्तरात रायडर्सच्या मधल्या फळीनं शरणागती पत्करली. लेंडल सिमन्स ( २०) व दिनेश रामदिन ( १७) या सलामीवीरांनंतर कॉलिन मुन्रो व डॅरेन ब्राव्हो एकेरी धावा करून माघारी परतले. टीम सेईफर्टनही ११ धावांवर बाद झाला. कर्णधार पोलार्ड व इसुरू उडाना यांनी रायडर्ससाठी खिंड लढवली. उडाना १६ चेंडूंत ३ षटकारांसह २५ धावांवर नाबाद राहिला. पोलार्डनं CPL च्या इतिहासात रायडर्सकडून सर्वात जलद ( २० चेंडूंत) अर्धशतक पूर्ण केले. पोलार्डनं २२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ५१ धावा केल्या. त्याच्या या खेळीनं रायडर्सनं ४ विकेट्स राखून विजय मिळवताना CPL 2021च्या गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले. ( Kieron Pollard's quickfire fifty and Isuru Udana's 16-ball 25 take Trinbago Knight Riders to top of the CPL 2021 points table) 

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगकिरॉन पोलार्डमुंबई इंडियन्स
Open in App