Join us

"पाकिस्तान विरुद्ध खेळायला आवडेल का?", खलील अहमदनं दिलेलं उत्तर वाचून म्हणाल मानलं भावा!

Khaleel Ahmed: खलील अहमदच्या गोलंदाजीनं तर तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोच. पण सध्या तो त्याच्या गोलंदाजीमुळे नव्हे, तर एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर त्यानं दिलेल्या उत्तरामुळे तो सोशल मीडियात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 16:42 IST

Open in App

Khaleel Ahmed: भारतीय संघाकडून खेळण्याची आणि देशाचं नाव जागतिक क्रिकेटमध्ये उंचावण्याची संधी मिळावी यासाठी देशातील प्रत्येक युवा क्रिकेटपटू उत्सुक असतो. यात स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचं दारही उघडतं. आजवर अशा अनेक युवा क्रिकेटपटूंनी भारतीय संघात पदार्पण केलं आहे. सध्या तर भारतीय क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंचाच बोलबोला आहे. असाच एक युवा गोलंदाज खलील अहमद चमकला आणि त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी देखील मिळाली होती. 

खलील अहमदच्या गोलंदाजीनं तर तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोच. पण सध्या तो त्याच्या गोलंदाजीमुळे नव्हे, तर एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर त्यानं दिलेल्या उत्तरामुळे तो सोशल मीडियात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. 

खलील अहमद यांनी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर प्रश्नोत्तराचं सेशन घेतलं होतं. यात त्यानं आपल्या चाहत्यांनी प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. त्यावर खलील अहमदनं दिलखुलास उत्तरं देखील दिली. यात एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

"तुला पाकिस्तान विरोधात खेळायला आवडेल का?", असा प्रश्न एका नेटिझनलला खलीलला विचारला. त्यावर खलीलनं तात्काळ उत्तर देत नेटिझनच्या मनसुब्यांना पूर्णविराम दिला. "भारताची जर्सी परिधान केल्यासमोर समोर कोणताही संघ येवोत. काही फरक पडत नाही", असा खणखणीत रिप्लाय खलीलनं दिला आहे. खलीलचा जबरदस्त रिप्लाय वाचून तुम्हालाही वाटलं असेल ना भावा एकच नंबर!

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआयसोशल व्हायरल