Kedar Jadhav: 12 महिने क्रिकेटपासून दूर; केदार जाधवचं जोरदार पुनरागमन, 7 डावात ठोकल्या 596 धावा

Ranji Trophy: क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर केदार जाधवने आतापर्यंत एक द्विशतक, एक शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 04:52 PM2023-01-25T16:52:51+5:302023-01-25T16:53:28+5:30

whatsapp join usJoin us
Kedar Jadhav, who was away from cricket for 12 months, made a strong comeback and scored 596 runs in 7 innings   | Kedar Jadhav: 12 महिने क्रिकेटपासून दूर; केदार जाधवचं जोरदार पुनरागमन, 7 डावात ठोकल्या 596 धावा

Kedar Jadhav: 12 महिने क्रिकेटपासून दूर; केदार जाधवचं जोरदार पुनरागमन, 7 डावात ठोकल्या 596 धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: केदार जाधव एकेकाळी भारतीय संघाच्या मधल्या फळीचा नियमित सदस्य होता. मात्र, वेळ कधी कोणाला संधी देईल आणि कोणाला डच्चू देईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. असेच काहीसे केदार जाधव या मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या बाबतीत झाले. केदार जाधवला भारतीय संघामधून अचानक वगळण्यात आले आणि आता त्याची आयपीएल कारकीर्द देखील जवळपास संपली आहे. कारण त्याला आयपीएलच्या मिनी लिलावामध्ये कोणत्याही फ्रॅंचायझीने खरेदी केले नाही. खरं तर हा मराठमोळा क्रिकेटपटू मागील 12 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर राहिला आहे. मात्र, आता त्याने जोरदार पुनरागमन करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

केदार जाधवच्या आक्रमक खेळीची झलक रणजी ट्रॉफी सामन्यामध्ये पाहायला मिळाली. सध्या महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना केदार जाधवने जबरदस्त शतक झळकावले. त्याने महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 168 चेंडूंचा सामना करत 128 धावा केल्या. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 15 वे शतक आहे.

महाराष्ट्राचा संघ अडचणीत सापडला असताना केदार जाधवने सावध खेळी करून डाव सावरला. आपला संघ संकटाचा सामना करत असताना त्याने हे शतक ठोकले. खरं तर तो फलंदाजीसाठी आला तेव्हा अवघ्या 23 धावांवर 2 गडी तंबूत परतले होते. मात्र, त्यानंतर त्याने सावध खेळी करून प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी वाढवली. 

12 महिने क्रिकेटपासून दूर आता गोलंदाजांना फोडला घाम
केदार जाधवचा फॉर्म आणि फिटनेसवर नेहमीच प्रश्नचिन्ह राहिले आहे. याच कारणामुळे त्याला वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागले. केदारने पुनरागमन करण्यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये तो फक्त रणजी ट्रॉफी सामन्यातून परतला. पहिल्या दोन सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त 43 धावा आल्या. पण पुढच्या 5 डावात त्याने धावांचा डोंगर उभा करत जोरदार पुनरागमन केले.  

7 डावात ठोकल्या 596 धावा
क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर केदार जाधवने आतापर्यंत एक द्विशतक, एक शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. या शानदार कामगिरीच्या जोरावर केदार जाधवने आतापर्यंत केवळ 7 डावात 596 धावा केल्या आहेत. 12 महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर त्याने नव्या इनिंगची सुरूवात केली.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Kedar Jadhav, who was away from cricket for 12 months, made a strong comeback and scored 596 runs in 7 innings  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.