Join us

KBC 13 : पाकिस्तानला नमवल्यानंतर कोणतं गाणं गातो?; अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नावर वीरूचं भन्नाट उत्तर, Video 

KBC 13 : भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी बिग बी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या कौन बनेगा करोडपती १३ मध्ये हजेरी लावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 10:56 IST

Open in App

KBC 13 : भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी बिग बी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या कौन बनेगा करोडपती १३ मध्ये हजेरी लावली. या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी वीरूला त्याच्या गाण्याच्या आवडीबद्दल विचारले आणि त्याची उत्तर ऐकून शेजारी बसलेल्या गांगुलीला हसू आवरता आले नाही.  

अमिताभ यांनी वीरूला विचारले की, क्रिकेट मॅच खेळताना तुम्ही गाणं गुणगुणायचा, ते खरं आहे का? यावर वीरूनं गाणं गाण्यास सुरूवात केली. चला जाता हूं किसी की धुन में!, त्यानंतर तू जेव्हा फिल्डींग करतोस आणि कॅच सुटल्यानंतर कोणतं गाणं गातोस?, असे अमिताभ यांनी विचारले.  

वीरू म्हणाला, ''जर प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आहेत, तर गाणं असेल - अपनी तो जैसै तैसे कट जाएगी, आपका क्या होगा जनाबे आली!'' त्यानंतर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध सामना जिंकल्यावर कोणतं गाणं गातोस?. यावर वीरूनं भन्नाट उत्तर दिलं. शहशाह मूव्हीतील प्रसिद्ध डायलॉग मारतो. अमिताभ यांनी त्यांच्या अंदाजात तो डायलॉग ऐकवला, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है!. अमिताभ यांच्या डायलॉग नंतर सेहवाग म्हणाला, हम तो बाप है हीं उनके! 

टॅग्स :विरेंद्र सेहवागकौन बनेगा करोडपतीसौरभ गांगुली
Open in App