काव्या मारनच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेताच 'सनरायजर्स'वर मोठी कारवाई

Kavya Maran Sunrisers Pakistan Cricketer Abrar Ahmed: पाकिस्तानी खेळाडू विकत घेतल्याने काव्या मारनवर चाहत्यांनी टीकेची झोड उठवली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:57 IST2026-03-13T13:56:41+5:302026-03-13T13:57:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
kavya maran troubles increase as big action against sunrisers after pakistan abrar ahmed joins team | काव्या मारनच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेताच 'सनरायजर्स'वर मोठी कारवाई

काव्या मारनच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेताच 'सनरायजर्स'वर मोठी कारवाई

Kavya Maran Sunrisers Pakistan Cricketer Abrar Ahmed: इंग्लंडमधील 'द हंड्रेड' (The Hundred) स्पर्धेसाठी पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याला करारबद्ध करण्याचा निर्णय काव्या मारनच्या सनरायझर्स लीड्स संघाला महागात पडताना दिसत आहे. या निवडीमुळे सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या वादादरम्यान संघाचे अधिकृत 'X' खाते सस्पेंड झाले आहे.

पाकिस्तानी खेळाडूची निवड

'द हंड्रेड'च्या लिलावात सनरायझर्स लीड्सने अबरार अहमदला सुमारे २.३४ कोटी रुपयांना खरेदी केले. या स्पर्धेत भारतीय मालकीच्या ४ फ्रँचायझी असून, फक्त सनरायझर्सनेच पाकिस्तानी खेळाडूला संधी दिली. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

सोशल मीडिया खाते निलंबित

अबरार अहमदच्या निवडीनंतर सनरायझर्स लीड्सच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात 'रिपोर्ट्स' करण्यात आले किंवा धोरणांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत 'X'ने हे खाते तात्पुरते बंद केले. खाते सस्पेंड होण्यामागे वाढता विरोध आणि सातत्याने होणारी टीका हे प्रमुख कारण मानले जात आहे.

काव्या मारनवर टीकेची झोड

आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच काव्या मारन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चाहत्यांनी असा सवाल केला आहे की, जर आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी असेल, तर भारतीय मालकीचे संघ परदेशी लीगमध्ये त्यांना का प्राधान्य देत आहेत? या वादामुळे सनरायझर्स हैदराबादच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता असून, आगामी काळात फ्रँचायझी आपला निर्णय बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हे खाते तांत्रिक कारणामुळे बंद झाले आहे की वाढत्या विरोधामुळे, यावर फ्रँचायझीने अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र, अबरार अहमदला संघातून मुक्त करावे, अशी मागणी नेटकऱ्यांकडून जोर धरत आहे.

Web Title : पाकिस्तानी खिलाड़ी को साइन करने पर काव्या मारन की टीम की आलोचना

Web Summary : सनराइजर्स लीड्स को 'द हंड्रेड' के लिए पाकिस्तानी खिलाड़ी अबरार अहमद को साइन करने पर आलोचना का सामना करना पड़ा। भारतीय प्रशंसकों ने गुस्सा व्यक्त किया, जिससे टीम का 'एक्स' अकाउंट निलंबित हो गया। आईपीएल में प्रतिबंध के बावजूद विदेशी लीग में पाकिस्तानी खिलाड़ियों को प्राथमिकता देने पर काव्या मारन जांच के दायरे में।

Web Title : Kavya Maran's team faces backlash for signing Pakistani player.

Web Summary : Sunrisers Leeds faced criticism for signing Pakistani player Abrar Ahmed for 'The Hundred'. Indian fans expressed anger, leading to suspension of the team's 'X' account. Kavya Maran faces scrutiny over prioritizing Pakistani players in foreign leagues while they're banned in IPL.