Join us

Kaun Pravin Tambe?: प्रौढांवर हसणाऱ्यांना चपराक ‘कोण प्रवीण तांबे?’

Kaun Pravin Tambe?: ४१ व्या वर्षी निवृत्ती घेण्याऐवजी खेळाडू पदार्पण करीत असेल तर काय म्हणावे? तुम्ही जर क्रिकेट आणि आयपीएल चाहते असाल तर ‘कोण प्रवीण तांबे’ हा सिनेमा आवर्जून पहायला हवा. चित्रपट पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 08:34 IST

Open in App

- मतीन खान(स्पोर्ट्‌स हेड -सहायक उपाध्यक्षलोकमत पत्रसमूह)४१ व्या वर्षी निवृत्ती घेण्याऐवजी खेळाडू पदार्पण करीत असेल तर काय म्हणावे? तुम्ही जर क्रिकेट आणि आयपीएल चाहते असाल तर ‘कोण प्रवीण तांबे’ हा सिनेमा आवर्जून पहायला हवा. चित्रपट पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात.  क्रिकेटमध्ये शिखर गाठण्याची धडपड खेळाडूला कुठवर नेते हा पैलू चित्रपटात फारच हृदयस्पर्शीपणे मांडण्यात आला आहे.

तांबेने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये स्थान मिळविण्यासाठी वयाच्या ४१ व्या वर्षापर्यंत सर्वस्व पणाला लावले. ओरिएन्ट शिपिंग कंपनीत व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून प्रवीणचा प्रवास सुरू झाला होता. कंपनीने १५०० रुपये वेतनावर काम देत ‘हिरा’ शोधण्याचे काम केले. सकाळी अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून रात्रीच्या वेळी बारमध्ये वेटरची नोकरी केली. घरखर्च तसेच पत्नी आणि दोन मुलींचा सांभाळ करण्यासाठी नोकरीची गरज होती.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने संघात निवड करताच तांबेचा संघर्ष फळाला आला. येथून आयुष्याला कलाटणी मिळाली. रणजी करंडक खेळण्याचे पाहिलेले स्वप्न देखील वयाच्या ४१ व्या वर्षी पूर्ण झाले. या चित्रपटात जो मुद्दा मांडण्यात आला तो असा की एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याची लोकांची दृष्टी त्याचे वय, वर्ण आणि शरीरयष्टी यावरून ठरत नसते. लोक त्या व्यक्तीला चुकीचे ठरविण्याचाही प्रयत्न करतात, मात्र त्यांची धारणा बदलणे आपल्या हातात असते. तांबेने हेच सिद्ध केले. ४१ व्या वर्षी देखील तांबेने क्रिकेट सोडले नाही. राजस्थान रॉयल्ससाठी त्याने दमदार कामगिरी केली. तुमचा हेतू प्रामाणिक असेल तर परिस्थितीदेखील यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही.  चित्रपटाचा सार असा की जग नेहमी तुम्हाला मागे खेचण्यास तयारच असते. 

तुम्हाला अपयशी ठरविण्याची एकही संधी सोडत नाही. पुढे जायचे असेल, स्वप्ने साकार करायची असतील तर स्वत: स्वत:चा   मार्ग शोधावा लागेल. शौर्य दाखवावे लागेल. परिस्थितीवर मात करावीच लागेल. तेव्हा स्वत:शी बोला...  जैसा भी हूं अच्छा या बुरा अपने लिए हूं मैं खुद को नहीं देखता दुनिया की नजरसे.

तांबेसारख्या जिद्दी खेळाडूंनी आपापल्या देशाकडून अधिक वयात पदार्पण केले, त्यांच्यावर नजर टाकूया...संघ     खेळाडू      वयऑस्ट्रेलिया       डॉन ब्लॅकी             ४६ वर्षे २५३ दिवसबांगलादेश        इनामूल हक            ३५ वर्षे ५८ दिवसइंग्लंड            जेम्स सदरटन       ४९ वर्षे ११९ दिवसभारत             रुस्तमजी जमशेदजी     ४१ वर्षे २७ दिवसआयर्लंड          एद जोयसे            ३९ वर्षे २३५ दिवसन्यूझीलंड           हर्ब  मॅकगीर       ३८ वर्षे १०१ दिवसपाकिस्तान          मिरान बख्श       ४७ वर्षे २८४ दिवसद. आफ्रिका       ओमर हेन्री         ४० वर्षे २९५ दिवसश्रीलंका            सोमचंद्रा डिसिल्वा ३९ वर्षे २५१ दिवसवेस्ट इंडीज       नेल्सन बेटनकोर्ट   ४२ वर्षे २४२ दिवसझिम्बाब्वे      ॲन्डी वॉलेर          ३७ वर्षे ८४ दिवस

टॅग्स :भारत
Open in App