भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज करुण नायर सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. चौथ्या कसोटी सामन्यात त्याला आणखी एक संधी मिळणार का? हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत असताना त्याच्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. तीन वर्षांनी त्याची घरवापसी झाली असून आता तो पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून खेळताना दिसणार आहे. विदर्भ क्रिकेट संघाकडून खेळताना त्याने खास कामगिरी करताना IPL सह टीम इंडियात कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. पण आता त्याने विदर्भ संघाची साथ सोडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
करुण नायनं सोडली विदर्भ संघाची साथ, आता...
विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून करुण नायरला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आली असून आगामी हंगामात तो कर्नाटकच्या ताफ्यातून मैदानात उतरले. २०२४-२५ च्या हंगामात करुण नायर याने विदर्भ संघाला रणडी ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या हंगामात त्याने ५३ च्या सरासरीसह ८६३ धावा काढल्या होत्या. केरळ विरुद्धच्या फायनल लढतीत त्याच्या भात्यातून शतकही आले होते.
मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड
तो आमच्या ताफ्यातील महत्त्वपूर्ण खेळाडू होता, पण...
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने करुण नायर याला रिलीज केल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, करुण नायर हा गेल्या काही सत्रात विदर्भ संघाकडून महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसला. त्याने संघ सोडू नये, असेच वाटत होते. पण शेवटी त्याचा निर्णय आहे. त्याच्या निर्णयाचा सन्मान करत आम्ही त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.
इंग्लंड दौऱ्यावर ठरला अपयशी
विदर्भ क्रिकेट संघाकडून खेळताना सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळेच ८ वर्षांनी त्याला इंग्लंड दौऱ्यावर कमबॅकची संधी मिळाली. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने सलग पाच शतकासह ७७९ धावा करताना खास विक्रम प्रस्थापित केला होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये नाबाद ५४२ धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर इंग्लंड दौऱ्यावर त्याला संधी मिळाली. पण तीन सामन्यात ६ डावात तो अपयशी ठरला. उर्वरित दोन सामन्यात त्याला संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Karun Nair to rejoin Karnataka for next year's Ranji season. Indian batter was the star performer for Vidarbha last year that led them to the title.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.