८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT

यामागचं कारण इंग्लंडमधील त्याचा फ्लॉप शो नाही तर वेगळेच आहे.   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:02 IST2025-08-07T10:57:51+5:302025-08-07T11:02:46+5:30

whatsapp join usJoin us
Karun Nair Ruled Out Of Duleep Trophy After England Tour Flop Show Due To Injury | ८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT

८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Karun Nair Ruled Out Of Duleep Trophy :  देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांची 'बरसात' केल्यामुळे आठ वर्षांनी टीम इंडियात कमबॅक करणारा करूण नायर इंग्लंड दौऱ्यावरील कसोटीत सपशेल अपयशी ठरला. कसोटीतील भारताचा दुसरा शतकवीर असलेल्या करुण नायरनं अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील ८ डावात फक्त एक अर्धशतक झळकावले. देशांतर्गत क्रिकेटमधील गत हंगामात त्याने रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खोऱ्यानं धावा काढल्या आहेत. पण इंग्लंड दौऱ्यावर 'नापास'चा ठपका लागल्यावर आता तो देशांतर्गत क्रिकेटमधील मोठ्या स्पर्धेला मुकणार आहे. जाणून घेऊयात त्यामागचं कारण.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कमबॅकची संधी मिळाली, पण...

इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर करुण नायरला पुढच्या कसोटी मालिकेत संधी मिळणं कठीण आहे, अशी चर्चा रंगत असताना आता तो देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेलाही मुकणार आहे. यामागचं कारण  इंग्लंडमधील त्याचा फ्लॉप शो नाही तर वेगळेच आहे.   

मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतून का आली OUT होण्याची वेळ!

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यातील ६ डावात अपयशी ठरल्यावर चौथ्या कसोटी सामन्यात करुण नायरला बाकावर बसवण्यात आले. पण मँचेस्टर कसोटीला मुकल्यावर ओव्हल कसोटी सामन्यात त्याला आणखी एक संधी मिळाली. पहिल्या डावात त्याने अर्धशतकी खेळीही केली. त्याची ही खेळी कसोटी कारकिर्दीतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. पण याच सामन्यात गस ॲटकिन्सनचा चेंडू लागल्यामुळे तो दुखापतग्रस्त झाला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बोटाला फॅक्चर असल्यामुळे तो २८ ऑगस्टपासून रंगणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेला मुकणार आहे.

ज्या संघामुळे नशीब पालटलं तो संघ सोडला
 
करुण नायरला ओव्हल कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर ही दुखापत झाली होती. स्पे मारून बॅटिंग केली. पण दुसऱ्या डावात तो फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरन फिल्डिंग करताना दिसले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये २०२२ पर्यंत करुण नायर कर्नाटक संघाचे प्रतिनीधीत्व करत होता. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे संघात स्थान मिळणं कठीण झाल्यावर त्याने विदर्भ संघाचा रस्ता धरला. इथं यशस्वी झाला अन् टीम इंडियात कमबॅकची संधीही मिळाली. त्यानंतर विदर्भ संघ सोडून त्याने पुन्हा आपल्या घरच्या संघाकडून अर्थात कर्नाटककडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Karun Nair Ruled Out Of Duleep Trophy After England Tour Flop Show Due To Injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.