Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)

क्वार्टर फायनलमध्ये मुंबई संघाविरुद्धही तळपली होती बॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:12 IST2026-01-15T18:07:21+5:302026-01-15T18:12:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Karnataka vs Vidarbha 1st Semi Final Karun Nair Fire Ex Team With 76 Runs Aman Mokhade Pulls Off A Fine Catch To Dismiss Darshan Nalkande Watch Video Vijay Hazare Trophy Elite 2025-26 | Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)

Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)

Karnataka vs Vidarbha 1st Semi Final, Karun Nair 76 Runs vs Ex Team : कर्नाटक विरुद्ध विदर्भ यांच्यात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलची लढत बंगळुरुस्थित बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड १ वर खेळवण्यात येत आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालसह कमालीच्या फॉर्ममध्ये असलेला देवदत्त पडिक्कल महत्त्वपूर्ण सामन्यात स्वस्तात आटोपला. सलामी जोडी तंबूत परतल्यावर करुण नायर याने याआधी ज्या संघाकडून खेळला त्या विदर्भ संघातील  संघातील गोलंदाजांच्या विरुद्ध जबरदस्त फटकेबाजी केली. पण एक्स टीम विरुद्ध त्याने दिमाखदार अर्धशतक झळकावले. पण यावेळीही त्याचा शतकी डाव हुकला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

क्वार्टर फायनलमध्ये मुंबई संघाविरुद्धही तळपली होती बॅट

देशांतर्गत क्रिकेटमधील गत हंगामात करुण नायर हा विदर्भ संघाकडून खेळताना दिसला होता. याच संघाकडून दमदार शो दाखवून त्याला टीम इंडियाकडून कमबॅकची संधी मिळाली. पण यंदाच्या हंगामात त्याने पुन्हा एकदा घरच्या संघाकडून अर्थात कर्नाटकच्या संघाकडून मैदानात उतरला. क्वार्टर फायनलमध्ये मुंबई संघाविरुद्ध नाबाद ७४ धावा करत संघाला सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवून देणाऱ्या करुण नायरनं आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखत विदर्भ संघाविरुद्ध दमदार खेळी केली. 

Vaibhav Suryavanshi Record : U19 वर्ल्ड कपमध्ये वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम; इथंही विक्रमांची ‘वैभवशाही' परंपरा कायम 

विदर्भ संघाविरुद्ध शतक साजरे करण्याच्या मूडमध्ये असताना फसला

Ex टीम विरुद्ध खेळताना तो शतकाला गवसणी सहज घालेल, असे वाटत होते. पण दर्शन नलकांडेच्या गोलंदाजीवर तो फसला. अमन मोखाडे याने उत्तम झेल टिपत करुण नायरच्या खेळीला ७६ धावांवर ब्रेक लावला. ९० चेंडूचा सामना करताना नायरनं आपल्या खेळीत ८ चौकारांसह १ उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.

नायरनं श्रीजिथच्या साथीनं केली शतकी भागीदारी

संघाच्या धावफलकावर ३ बाद ७४ धावा असताना करुण नायर याने कृष्णन श्रीजिथच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९७ चेंडूत ११३ धावांची दमदाह भागीदारी रचली. करुण नायर माघारी फिरल्यावर कृष्णन श्रीजिथ ५३ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ५४ धावा करून बाद झाला. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर गत विजेत्या कर्नाटक संघाने पुन्हा फायनल खेळण्यासाठी ४९.१ षटकात २८० धावांपर्यंत मजल मारल्याचे पाहायला मिळाले.

Web Title : करुण नायर की शानदार पारी; पूर्व टीम के खिलाफ शतक चूके।

Web Summary : विजय हजारे ट्रॉफी में, करुण नायर ने अपनी पूर्व टीम विदर्भ के खिलाफ 76 रनों की शानदार पारी खेली, लेकिन शतक से चूक गए। केएल श्रीजिथ के साथ साझेदारी में, उन्होंने कर्नाटक को संभाला, लेकिन कर्नाटक 280 तक ही पहुंच सका।

Web Title : Karun Nair's solid innings; century missed against former team.

Web Summary : In the Vijay Hazare Trophy, Karun Nair's impressive 76 against his former team, Vidarbha, wasn't enough for a century. Partnering with KL Shrijith, he helped Karnataka recover, but fell short of the milestone as Karnataka reached 280.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.