CM Omar Abdullah Clapping for Qamran Iqbal Who Scored Century During Ranji Trophy Finals हुबळी येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात जम्मू काश्मीरच्या संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीतील धमक दाखवली. पहिल्यांदा फायनल खेळणाऱ्या जम्मू काश्मीरच्या संघासमोर आठ वेळचा रणजी चॅम्पियन कर्नाटक संघ हतबल झाल्याचे दिसले. पहिल्या डावात ५८४ धावा करुन कर्नाटकच्या संघाला २९३ धावांवर आटोपल्यावर दुसऱ्या डावातही जम्मू काश्मीरच्या बॅटर्संनी धमक दाखवली. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ऐतिहासिक जेतेपदाची औपचारिकता बाकी असताना जम्मू काश्मीरच्या कामरान इक्बाल याने दमदार शतक झळकावले. हा क्षण या बॅटरसाठी अविस्मरणीय असाच आहे. त्याच्या शतकाला स्टेडियमवर उपस्थितीत असलेल्या जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही उभे राहून टाळ्या वाजवत दाद दिल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दमदार शतक अन् संघातील खेळाडूंसह CM ओमर अब्दुल्लांचा तो व्हिडिओ व्हायरल
जम्मू काश्मीरच्या संघाने पहिल्या डावात २९१ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात एका बाजूला विकेट्स पडत असताना सलामीवीर ओमार इक्बाल याने मैदानात तग धरून उभा राहत संघाची ही आघाडी अधिक भक्कम केली. त्याने १८९ चेंडूत शतक साजरे केले. सलामीवीराच्या शतकी खेळीनंतर डगआउटमधील खेळाडूंसह जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रीCM ओमर अब्दुल्ला यांनीही त्याच्या शतकाचे उभे राहून टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सलामीवीराच्या शतकाला मुख्यमंत्र्यांनी दिलेली दाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
जम्मू काश्मीरमध्येही क्रिकेटर आहेत, पण...
रणजी करंडक स्पर्धेतील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी जम्मू काश्मीरचा संघ इतिहास रचणार हे पक्के आहे. कारण हा सामना अनिर्णित राहिला तरी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जम्मू काश्मीरचा संघ पहिले जेतेपद उंचावेल. संघाच्या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ओमार अब्दुला देखील स्टेडियमवर उपस्थितीत आहेत. संघाला चीअर करण्यासाठी हुबळीला पोहचल्यावर ओमर अब्दुला यांनी आम्ही ट्रॉफी जिंकूनच जाऊ असा विश्वास व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की, जम्मू काश्मीरचा संघ रणजी ट्रॉफी स्पर्धेत फायनलमध्ये पोहचला हीच गोष्ट आमच्यासाठी खूप खास होती. काही लोक म्हटले की, इथपर्यंत आलो यापुढे जाता येणार नाही. पण जम्मू काश्मीरच्या खेळाडूंनी आपल्यातील धमक दाखवली. फायनलमध्ये त्यांनी केलेली कामगिरी अभिमानस्पद आहे. जम्मू काश्मीरमध्येही प्रतिभावंत क्रिकेटर आहेत. फक्त इकडे कुणाचे लक्ष नाही, अशा शब्दांत त्यांनी संघाची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे म्हटले होते.
Web Summary : Kamran Iqbal's century in the Ranji Trophy final drew praise. J&K dominated Karnataka. CM Omar Abdullah lauded Iqbal's innings with a standing ovation, celebrating the team's historic performance and talent.
Web Summary : रणजी ट्रॉफी फाइनल में कामरान इकबाल के शतक की सराहना हुई। जम्मू-कश्मीर ने कर्नाटक पर दबदबा बनाया। मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने खड़े होकर सलामी दी, टीम के प्रदर्शन और प्रतिभा का जश्न मनाया।