Join us  

कंगणा राणौतने घेतला परत एकदा पंगा; करून टाकलं विराट कोहलीचं बारसं...

कोहलीही आक्रमक आहे. त्यामुळे आता कोहली यावर काय वक्तव्य करतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 6:06 PM

Open in App

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री कंगणा राणौत ही नेहमीच कोणता ना कोणता पंगा घेत असते. आतापर्यंत तिने बॉलीवूडमधील व्यक्तींशी पंगा घेतला होता. पण आता तर तिने भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

विराट आणि बॉलीवूड यांचे फार जुने कनेक्शन आहे. कोहलीचे बरेच मित्र-मैत्रीण बॉलावूडमध्ये आहेत. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मादेखील बॉलीवूडमध्ये काम करते. त्यामुळे कोहलीला बॉलीवूड नवीन नाही, त्याचबरोबर बॉलीवूडमधील लोकांनाही कोहली चांगलाच परिचित आहे.

कंगणाला बॉलीवूडमध्ये पंगा क्वीन या नावाने ओळखले जाते. कारण पंगा घेताना ती  कोणालाही घाबरत नाही. आतापर्यंत बॉलीवूडमधील दिग्गज लोकांबरोबरही तिने पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता तर अनुष्काचा पती आणि भारताचा कर्णधार कोहलीबरोबर तिने पंगा घेतला आहे. कोहलीही आक्रमक आहे. त्यामुळे आता कोहली यावर काय वक्तव्य करतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

यावेळी कंगणा म्हणाली की, " मी 'पंगा क्वीन' म्हणून ओळखली जाते, तर कोहली हा मला 'पंगा किंग' वाटतो. कारण कोहली हा बिनधास्त आहे आणि तो कोणतेही आव्हान स्वीकारतो. त्यामुळे आमच्या दोघांचेही स्वभान सारखेच आहेत." 

काही तासांपूर्वीच आयसीसीची क्रिकेट क्रमवारी जाहीर झाली आहे. या क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण भारताच्या एका फलंदाजाकडून विराटला धोका असल्याचे म्हटले जात आहे. कारण तो भारताचा फलंदाज हा दुसऱ्या स्थानावरच आहे.

या यादीमध्ये विराट यापूर्वीही अव्वल स्थानावर विराजमान होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर त्याच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. या मालिकेपूर्वी कोहली ८८४ गुणांसह पहिल्या स्थानावर होता. या मालिकेमध्ये कोहलीने दोन अर्धशतके झळकावली. त्यामुळे कोहलीच्या खात्यात दोन गुण जमा झाले. त्यामुळे कोहली सध्या ८८६ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे.

गेल्या मालिकेत विराटबरोबर धवननेही चांगली फलंदाजी केली होती. पण दुसऱ्या सामन्यात धवन फलंदाजी करताना जायबंदी झाला. या सामन्यात धवनने सर्वाधिक ९६ धावांची खेळी साकारली होती. पण क्षेत्ररक्षणाला मात्र तो उतरला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही धवन खेळू शकला नव्हता.

सध्याच्या घडीला जो भारताचा फलंदाज दुसऱ्या स्थानावर आहे, त्याच्यामध्ये आणि कोहलीमध्ये फक्त तीन गुणांचा फरक आहे. त्यामुळे या फलंदाजाने चार गुण मिळवले तर नक्कीच विराटला मागे टाकून त अव्वल स्थानावर विराजमान होऊ शकतो. आता हा फलंदाज कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर हा फलंदाज आहे भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा. रोहितच्या खात्यात सध्या ८६५ गुण आहेत आणि तो दुसऱ्या स्थानावर आहे.

टॅग्स :विराट कोहलीकंगना राणौत