वेलिंग्टन : यंदाच्या आयपीएल दरम्यान दुखापतग्रस्त झालेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आयसीसी विश्वचषक स्पर्धेआधी तंदुरुस्त होण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. ३१ मार्चला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून खेळताना विलियम्सनच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावेळी, त्याला चालायलाही जमत नव्हते. 
एका संकेतस्थळाशी संवाद साधताना विलियम्सनने सांगितले की, ‘मी प्रत्येक आठवड्यानुसार माझ्या दुखापतीचा आढावा घेतोय. अशा प्रकारची दुखापत मला याआधी कधीही झाली नव्हती. पण, ज्यांना अशी दुखापत झाली आहे, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कळले की, ही स्थिती फारवेळ राहणार आहे. मी फार विचार करत नाहीए. या दुखापतीतून सावरणे सोपे जाणार नसून अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. जिममध्ये मेहनत घेत असून पुनरागमनासाठी उत्सुक आहे.’