Kane Williamson Retirement : न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसन याने आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हे. छोट्या फॉरमॅटमध्ये युवा खेळाडूंना संधी मिळावी, हा विचार करून छोट्या फॉरमॅटमधून थांबण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. २०२४ मध्ये न्यूझीलंडसाठी तो शेवटचा टी-२० सामना खेळला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निवृत्तीची ही योग्य वेळ
निवृत्तीबद्दल बोलताना केन विल्यमसन म्हणाला आहे की, क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची ही योग्य वेळ आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या आगामी टी-२० विश्वचषकाची तयारी करत आहे. संघात अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देणं महत्त्वाचे आहे. मिचेल सँटनर हा एक उत्तम कर्णधार असून त्याने आपल्यातील नेतृत्व क्षमता दाखवून दिली आहे. तो न्यूझीलंड संघाला या फॉरमॅटमध्ये पुढे घेऊन जाईल. मी संघाचा भाग नसलो तरी संघासोबत असेन, असेही केन विल्यमसन याने म्हटले आहे.
T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारे ६ धुरंधर! आघाडीच्या ३ मध्ये २ भारतीय, पण...
न्यूझीलंड संघाकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा
केन विल्यमसन याने २०११ मध्ये न्यूझीलंड संघाकडून टी-२० मध्ये पदार्पण केले. आपल्या टी-२० कारकिर्दीत त्याने ९३ टी-२० सामन्यांमध्ये एकूण २,५७५ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ९५ ही त्याची आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये या फॉरमॅटमध्ये खेळथ राहीन, ही गोष्टही त्याने स्पष्ट केली आहे.
विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडनं टी-२० वर्ल्ड कपची फायनल गाठली, पण...
केन विल्यमसन याने फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेच. याशिवाय टी-२० संघाचे नेतृत्व करतानाही त्याने खास छाप सोडली आहे. छोट्या प्रारुपात ७५ टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करताना त्यानं ३९ सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघाने २०१६ आणि २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेत उंपात्य फेरी गाठली होती. २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने संघाला फायनलपर्यंत नेले होते. पण ऑस्ट्रेलियाकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.