Join us

गब्बरशी पंगा घेण रबाडाला पडले भारी, आयसीसीनं केली कारवाई

सामना संपल्यानंतर रबाडाने आपली चूक मान्य करत आयसीसीने केलेली कारवाई स्वीकारली. त्यामुळे आणखी कोणतीही सुनावणी करण्याची गरज भासली नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 18:26 IST

Open in App

पोर्ट एलिझाबेथ -  विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने नवा इतिहास रचला. पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारतानं 73 धावांनी विजय मिळवत वनडे मालिकेवर 4-1 ने कब्जा मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमधील भारताचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे.  भारताने सांघिक कामगिरीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात कसिगो रबाडाला शिखर धवनशी पंगा घेणं चांगलेच महागात पडले आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कसिगो रबाडाला आयसीसीच्या आचार सहिंतेच उल्लघंन केल्याप्रकरणी दोषी ठरवले असून सामन्यातीस रक्कमेच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. सामन्याच्या रकमेच्या 15 टक्के दंडासोबत रबाडाला एक नकारात्मक गुणही देण्यात आला आहे. 

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकांत शिखर धवन बाद झाल्यानंतर रबाडाने त्याला तंबूत जाण्याचा इशारा केला होता. त्याबरोबरच शिखर धवनला बोलला होता. रबाडावर अंपायर इयान गाउल्ड, शॉन जॉर्ज आणि तीसरे अंपायर अलीम दार यांच्याशिवाय चौथे अंपायर बोंगनी जेले यांनी अनुच्छेद 2.1.7 या नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. 

सामना संपल्यानंतर रबाडाने आपली चूक मान्य करत आयसीसीने केलेली कारवाई स्वीकारली. त्यामुळे आणखी कोणतीही सुनावणी करण्याची गरज भासली नाही. 

भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दिलेलं 275 धावांचं आव्हान पार करताना आफ्रिकन फलंदाजांची पुरती दमछाक उडाली आहे. अमला एकाकी झुंज देत दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी प्रयत्नशील होता. पण तो 71 धावांत बाद झाला आणि भारताचं पारडं जड झालं. टीम इंडियाकडून कुलदीपने 57 धावांत चार फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८शिखर धवन