Join us  

सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, मिचेल मार्शची IPL2020तून माघार; विंडीजचा स्टार खेळाडू दाखल

Indian Premier League ( IPL 2020) दुखापतींचे सत्र कायम आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: September 23, 2020 4:18 PM

Open in App

सनरायझर्स हैदराबाद संघाला ( SRH) त्याचा मोठा फटका बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या ( RCB) सामन्यात दुखापतग्रस्त झालेला अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श ( Mitchell Marsh ) याने IPL 2020मधून माघार घेतली आहे.  RCBच्या 163 धावसंख्येचा पाठलाग करताना मजबूत स्थिती असतानाही हैदराबादचा डाव 153 धावांत संपुष्टात आला. हैदराबादने हा सामना तर गमावलाच, मात्र त्याचवेळी मार्श झालेल्या दुखापतीमुळे आता त्यांच्या चिंतेत भरही पडली होती. मार्शच्या माघारीमुळे SRHला मोठा धक्का बसला आहे. ( Live Score & Updates )

Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका

 महेंद्रसिंग धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय? त्याने जे केलं त्याचं समर्थन करावं का?  

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या घसरगुंडीची अधिक चर्चा झाली. आरसीबीने सामना जिंकण्यापेक्षा हैदराबादने त्यांना विजय बहाल केला असेच चाहते म्हणत आहेत. या सामन्यात हैदराबादला मोठा धक्का बसला तो स्टार अष्टपैलू मिशेल मार्शच्या दुखापतीचा. गोलंदाजी करताना पायाची टाच दुखावल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. मात्र आता मार्शची दुखापत अत्यंत गंभीर असल्याची माहिती हैदराबाद संघाच्या सूत्राकडून मिळाली आहे. यामुळे आता त्याला आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांतही खेळता येणार नाही.

आरसीबीच्या डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने चेंडू मार्शकडे सोपविला. यावेळी दुसऱ्या चेंडूवर अ‍ॅरोन फिंचने मारलेला ड्राईव्ह फटका अडविण्याच्या प्रयत्नात मार्शच्या पायाची टाच दुखावली गेली. यानंतरही त्याने दोन आणखी चेंडू टाकले. चौथा चेंडू टाकल्यानंतर मात्र त्याची दुखापत उफाळून आली आणि त्याला मैदान सोडावे लागले. यानंतर तो दहाव्या क्रमांकावर फलंदाजीलाही आला, परंतु यावेळी त्याला नीट उभेही राहता येत नव्हते. त्याने IPL2020तून माघार घेतल्याचे SRHने सांगितले आणि त्याला बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर संघाल दाखल होणार आहे. 

 

महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं 

संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video

महेंद्रसिंग धोनीने खेचलेला षटकार गेला स्टेडियम पार; पाहा तीन खणखणीत Six 

महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी

Hard Luck!, CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनानं केलेलं ट्विट व्हायरल

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबाद