Join us  

Shreyas Iyer : खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे IPL, T20 World Cup स्पर्धेला मुकला, पण नाही खचला; आज श्रेयस अय्यरनं इतिहास रचला 

the journey of Shreyas Iyer in 2021 - भारतात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत श्रेयसला सराव करताना दुखापत झाली. त्यानंतर खांद्यावरील शस्त्रक्रियेमुळे तो बराच काळ  क्रिकेटपासून दूर होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:15 AM

Open in App

the journey of Shreyas Iyer in 2021 - २०१७च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत  श्रेयस अय्यरचा ( Shreyas Iyer) कसोटी संघात समावेश करण्यात आला होता... विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली अन् अय्यरला रिप्लेसमेंट म्हणून ताफ्यात घेतले. पण, त्या मालिकेतील अखेरच्या कसोटीत ( धर्मशाला) अंतिम ११मध्ये त्याला स्थान  मिळाले नाही. भारतानं ती मालिका २-१ अशी जिंकली आणि विजयी षचकासोबतचा श्रेयसचा फोटो त्याच्या वडिलांनी  WhatsApp DP म्हणून तसाच कायम राखला.

मुलानं कसोटी क्रिकेट खेळावं ही त्यांची इच्छा होती आणि काल त्याच्या पदार्पणानं ती पूर्ण झाली. त्यात  कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रेयसनं शतक झळकावून दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावलं. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा भारतीय फलंदाज ठरला. पण, मागील दोन वर्ष श्रेयससाठी खूप कष्टाची राहिली आणि आजच्या शतकानंतर त्याला मेहनतीचं फळ मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत श्रेयसला सराव करताना दुखापत झाली. त्यानंतर खांद्यावरील शस्त्रक्रियेमुळे तो बराच काळ  क्रिकेटपासून दूर होता. त्याला आयपीएल २०२१च्या पहिल्या पर्वाला मुकावे लागले. त्याचमुळे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदही त्याच्याकडून गेले. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्यानं चांगला खेळ केला, परंतु तरीही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात त्याला स्थान मिळाले नाही. पण, आज कसोटी पदार्पणात शतक झळकावून त्यानं त्याची दखल घेण्यास जगाला भाग पाडले आहे.

जाणून घ्या भारताकडून पदार्पणात शतक झळकावणाऱ्या फलंदाजांची यादी

  1. लाला अमरनाथ - १५६ धावा वि. इंग्लंड, १९३३
  2. दीपक शोधान - ११० धावा वि. पाकिस्तान, १९५२
  3. क्रिपाल सिंह - १००* धावा वि. न्यूझीलंड, १९५५
  4. अब्बास अली बेग - १३८ धावा वि. इंग्लंड, १९५९
  5. हनुमंत सिंग  - १२८ धावा वि. इंग्लंड, १९६४
  6. गुंडप्पा विश्वनाथ - १३७ धावा वि. ऑस्ट्रेलिया, १९६९
  7. सुरींदर अमरनाथ - १३३ धावा वि. न्यूझीलंड, १९७६ 
  8. मोहम्मद अझरुद्दीन - ११० धावा वि. इंग्लंड, १९८४
  9. प्रविण आम्रे - १०३ धावा वि. दक्षिण आफ्रिका, १९९२
  10. सौरव गांगुली - १३१ धावा वि. इंग्लंड, १९९६
  11. वीरेंद्र सेहवाग - १३६ धावा वि. दक्षिण आफ्रिका, २००१
  12. सुरेश रैना - १२० धावा वि. श्रीलंका, २०१०
  13. शिखर धवन - १८७ धावा वि. ऑस्ट्रेलिया, २०१३
  14. रोहित शर्मा - १७७ धावा वि. वेस्ट इंडिज, २०१३
  15. पृथ्वी शॉ - १३४ धावा वि. वेस्ट इंडिज, २०१८
  16. श्रेयस अय्यर - १०५ धावा वि. न्यूझीलंड, २०२१ 
टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघश्रेयस अय्यर
Open in App