Join us  

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी; पंतप्रधान मोदींच्या आजच्या आवाहनानं खरी ठरली?

भारताचे पंरप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 3:00 PM

Open in App

भारताचे पंरप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी लॉकडाऊनच्या 9 दिवसांच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन सरकार, प्रशासन यांनी आपापल्यापरिने यशस्वी केले त्याबद्दल आभार मानले. जनता कर्फ्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक हे भारताने जगाने शिकवलं. कोरोनाविरुद्ध जनता एकत्र येऊन सामूहिकरित्या ही लढाई लढतोय हे जनतेने दाखवून दिलं असंही ते म्हणाले. आज मोदीं, 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील लाईट्स बंद करून दिवा, मेणबत्ती, मोबाईल फ्लॅश लाईट अथवा टॉर्च लावण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनानंतर इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर चर्चेत आला आहे. 

''या कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल,'' असे मोदींनी सांगितले.

मोदींच्या या आवाहनानंतर जोफ्रा आर्चरचं 2013वर्षाचं ट्विट व्हायरल होत आहे. आर्चरने केलेली भविष्यवाणी खरी ठरते, असा तर्क नेटिझन्स अनेकदा लावतात आणि मोदींच्या आजच्या आवाहनाचा संबंध त्यांनी आर्चरच्या 7 वर्षांपूर्वीच्या ट्विटशी जोडला आहे. 

पाहा आर्चरनं काय ट्विट केलं होतं..  नेटिझन्सनी कसा जोडला संबंध... जोफ्रानं सहा वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटमध्येही अशाच परिस्थितीची भविष्यवाणी केली होती आणि लोकांनी त्याचा संबंध सध्याच्या परिस्थितीशी जोडून जोफ्राला देवाची उपाधी दिली आहे. 2014मध्ये जोफ्रानं ट्विट केलं होतं की,''पळायलाही जागा राहणार नाही, असा दिवस येईल.''   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

केव्हीन पीटरसन-विराट कोहलीची चर्चा सुरू असताना अनुष्कानं ऑर्डर सोडली अन्...

भारताच्या फिरकीपटूचे समाजकार्य, 350 गरीब कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार

अजिंक्य रहाणेकडून राज्य सरकार अन् महानगरपालिकेच्या 'त्या' उपक्रमाचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडापटूंना सांगितले 'पाच' मंत्र, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यानरेंद्र मोदीइंग्लंड