Corona Virus : PM Narendra Modi to speak to Sourav Ganguly, Sachin Tendulkar, Virat Kohli and Virender Sehwag among others via video call svg | Corona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार

Corona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लॉकडाऊन होऊन आज ९ दिवस झाले, या काळात सर्वांनी एकत्र येऊन सरकार, प्रशासन यांनी आपापल्यापरिने यशस्वी केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानले. जनता कर्फ्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक हे भारताने जगाने शिकवलं. कोरोनाविरुद्ध जनता एकत्र येऊन सामूहिकरित्या ही लढाई लढतोय हे जनतेने दाखवून दिलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.  

''या कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल असं,'' असे मोदींनी सांगितले.

आता पंतप्रधान मोदी देशातल्या विविध क्षेत्रातील खेळाडूंशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधणार आहेत. आयएएनएसनं दिलेल्या माहितीनुसार मोदी व्हिडीओ कॉल करून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अन्य खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. या संवादातून ते खेळाडूंना लोकांमध्ये अधिकाधिक जनजागृती करण्याचं आवाहन करा असे सांगणार आहेत.   

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus : PM Narendra Modi to speak to Sourav Ganguly, Sachin Tendulkar, Virat Kohli and Virender Sehwag among others via video call svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.