Join us

इंग्लंडचा जो रूट ठरला 'जगात भारी'! कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला विश्वविक्रम!

Joe Root Sachin Tendulkar, NZ vs ENG 1st Test : जो रूट - जेकब बेथेल जोडीच्या नाबाद भागीदारीने इंग्लंडला मिळवून दिला विजय, मालिकेत १-० ने घेतली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 20:18 IST

Open in App

Joe Root Sachin Tendulkar, NZ vs ENG 1st Test : इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला. क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३४८ धावा केल्या तर इंग्लंडचा पहिला डाव ४९९ धावांवर संपला. इंग्लंडने शतकी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा डाव २५४ धावात आटोपला. त्यामुळे इंग्लंडला चौथ्या डावात १०४ धावांचे माफक आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने २ गड्यांच्या मोबदल्यात सामना जिंकला. जेकब बेथलने नाबाद अर्धशतक केले. तर जो रूटने नाबाद २३ धावा करत विश्वविक्रम रचला.

१०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जॅक क्रॉली १ धाव काढून तर बेन डकेट २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर बेथेल आणि रूट जोडीने नाबाद राहत सामना जिंकला. जो रूटने ३ चौकार आणि एक षटकार खेचत १५ चेंडूत २३ धावा केल्या. १०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जॅक क्रॉली १ धाव काढून तर बेन डकेट २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर बेथेल आणि रूट जोडीने नाबाद राहत सामना जिंकला. जो रूटने ३ चौकार आणि एक षटकार खेचत १५ चेंडूत २३ धावा केल्या. त्यासह जो रूटने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. रूटने आतापर्यंत कसोटीच्या चौथ्या डावात १६३० धावा पूर्ण केल्या. त्याआधी सचिन तेंडुलकर या यादीत पहिला होता. त्याने १६२५ धावा केल्या. पण रूटने त्याला मागे टाकत नवा विश्वविक्रम रचला.

कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • जो रूट- १६३०
  • सचिन तेंडुलकर- १६२५
  • अलिस्टर कूक- १६११
  • ग्रॅमी स्मिथ- १६११
  • शिवनारायण चंद्रपॉल- १५८० 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

जो रूटने इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही विक्रम केला. त्याने सर अलिस्टर कुकला मागे टाकले. कुकने १६१ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत १२ हजार ४७२ धावा केल्या होत्या. जो रूटच्या आजच्या खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये १२ हजार ७७७ धावा झाल्या आहेत. तो कसोटी धावांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. पहिल्या चार स्थानांवर अनुक्रमे सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांची नावे आहेत.

टॅग्स :जो रूटसचिन तेंडुलकरअॅलिस्टर कुकइंग्लंडन्यूझीलंड