Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : न्यूझीलंडच्या Big-hitter फलंदाजाचं निधन

अखेरचा कसोटी सामना टीम इंडियाविरुद्ध अन् वन डे पदार्पणही भारताविरुद्धच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 16:17 IST

Open in App

न्यूझीलंड संघाचा माजी यष्टिरक्षक आणि बिग हिटर फलंदाज जोक एडवर्ड यांचे वयाच्या 64व्या वर्षी निधन झाले. एडवर्ड यांनी 1976-77मध्ये फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्याकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी आहे. इंग्लंड दौऱ्यावर त्यांना यष्टिंमागे साजेशी कामगिरी करता आली नाही. 1981मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला आणि तोही टीम इंडियाविरुद्ध... त्यांनी केवळ 8 कसोटी सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले.

इंग्लंडविरुद्धच्या ऑकलंड कसोटीत त्यांनी 105 चेंडूंत 55 धावांची खेळी केली होती. त्याच कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यांनी 67 चेंडूंत 54 धावा चोपल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 47 चेंडूंत 51 धावा हे त्यांचे सर्वात जलद अर्धशतक होते. त्यात 11 चौकारांचा समावेश होता. 

एडवर्डनं 1976 ते 1981 या कालावधीत सहा वन डे सामनेही खेळले. भारताविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करताना त्यांनी 57 चेंडूंत 41 धावा करून न्यूझीलंडला 9 विकेट्सनं विजय मिळवून दिला होता. एडवर्ड यांनी स्थानिक क्रिकेटमध्येही योगदान दिले आहे.  

टॅग्स :न्यूझीलंडआयसीसी