IPL स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या विदर्भकरानं मोठा निर्णय घेतला आहे. विकेट किपर बॅटर जितेश शर्मा देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ क्रिकेट संघ सोडून आता वडोदराच्या ताफ्यातून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रुणाल पांड्याच्या साथीनं त्याने हा डाव खेळल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. दोघेही आयपीएलमध्ये RCB च्या ताफ्यातून खेळताना दिसले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० त कॅप्टन्सी केली, पण रणजी संघात संधीच नाही मिळाली
गत हंगामातील सैय्यद मुश्ताक अली या देशांतर्ग टी-२० स्पर्धेत जितेश शर्मानं विदर्भ संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या कॅप्टन्सीत विदर्भ संघाने क्वार्टर फायनलपर्यंत मजलही मारली होती. पण २०२४-२५ च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भ संघाकडून त्याला संधीच मिळाली नाही. त्यामुळेच त्याने आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला मार्ग बदलल्याचे दिसते. जितेश शर्मा भारताकडून ९ टी २० सामन खेळला आहे.
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
अशी आहे जितेश शर्माची आतापर्यंतची कामगिरी
जितेश शर्मानं २०१५ मध्ये विदर्भ संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गत हंगामात रणजी सामन्यात तो संघाचा भाग नव्हता. २०२४ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अखेरचा सामना खेळला होता. १८ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ६२१ धावा केल्या आहेत. ५६ लिस्ट ए सामन्यात १,५३३ धावा आणि १४१ टी २० सामन्यात त्याने २,८८६ धावा केल्या आहेत.
जितेश शिवाय जम्मू काश्मीरच्या रसीख सलामचीही वडोदरा संघात एन्ट्री
जितेश शर्माशिवाय जम्मू काश्मीरच्या रसीख सलाम यानेही वडोदरा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५ सामन्यात त्याच्या खात्यात १३ विकेट्स जमा आहेत. याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ३६ सामन्यात ४५ विकेट्स घेतल्या आहेत. रसीख सलाम याने ऑक्टोबर २०१८ मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून जम्मू-काश्मीरकडून लिए क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याचवर्षी त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली होती. आता तो वडोदरा संघाकडून खेळताना दिसेल.