IND vs NZ 3rd T20I, Jasprit Bumrah Bowled Tim Seifert : गुवाहटीच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहनं जबरदस्त कमबॅक केले. पहिल्या सामन्यात विकेट लेस राहिलेल्या बुमराहला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. तिसऱ्या सामन्यात अर्शदीपच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. पॉवर प्लेमध्ये सहाव्या षटकात सूर्यकुमार यादवनं त्याच्याकडे चेंडू सोपवला. या षटकातील पहिल्याच सामन्यात बुमराहनं न्यूझीलंडच्या टिम सिफर्ट (Tim Seifert) चा अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हर्षित राणा अन् हार्दिक पांड्यानंतर बुमराहनंही पहिल्याच षटकात साधला विकेटचा डाव
सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर जसप्रीत बुमराह भारतीय संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करेल, अशी अपेक्षा होती. पण सूर्यानं आधी चेंडू हर्षित राणाकडे सोपवला. त्याने पहिल्याच षटकात डेवॉन कॉन्वेच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिली. दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला अन् त्यानेही आपल्या पहिल्या षटकात विकेटचा डाव साधला. या दोघांची प्रत्येकी २-२ षटकांच्या स्पेलनंतरही जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला नाही. सूर्यानं पाचव्या षटकात रवी बिश्नोईकडे चेंडू सोपवला. त्याने फक्त एक धाव देत हे षटक संपवले. मग जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला अन् त्याने पहिल्याच चेंडूवर टिम सिफर्टच्या रुपात न्यूझीलंडला तिसरा धक्का देत विकेटसह षटकाची सुरुवात केली.
IND vs NZ : T20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियात बदल? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यानं दिली हिंट
जबरदस्त कमबॅक ही बुमराहची खासियत पुन्हा दिसली
जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचे गोलंदाजीतील प्रमुख शस्त्र आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात तो विकेटसाठी संघर्ष करताना दिसला होता. बुमराहनं नागपूरच्या मैदानातील सामन्यात ३ षटकात २९ धावा खर्च केल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात विश्रांती घेतल्यावर पुन्हा संघात पुनरागमन करताना त्याने आपल्या गोलंदाजीतील धार पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. बुमराहनं टिम सिफर्टला टाकलेला चेंडू एवढा जबरदस्त होता की, चेंडू पडला कधी अन् त्रिफळा उडला कधी ते किवी फलंदाजाला कळलं ही नाही. त्याने ११ चेंडूत १२ धावांची खेळी केली.
Web Summary : Jasprit Bumrah made a stunning comeback in the third T20I against New Zealand in Guwahati. After being wicketless in the first match and rested in the second, Bumrah took Tim Seifert's wicket with a perfect delivery in the powerplay.
Web Summary : गुवाहाटी में न्यूजीलैंड के खिलाफ तीसरे टी20I में जसप्रीत बुमराह ने शानदार वापसी की। पहले मैच में विकेट रहित रहने और दूसरे में आराम करने के बाद, बुमराह ने पावरप्ले में टिम सिफर्ट का विकेट लिया।