Join us

Jasprit Bumrah Sanjana Ganesan, IND vs SL 2nd Test: नवरोबांच्या कामगिरीवर बायको खुश! बुमराहने डाव पाच बळी घेत केला पराक्रम; पत्नी संजना ट्वीट करून म्हणते...

बुमराहने पहिल्या डावात श्रीलंकन गोलंदाजांची उडवली दाणादाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 16:10 IST

Open in App

बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. भारताने पहिल्या डावात श्रीलंकेला केवळ १०९ धावांत गुंडाळले. ज्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या फिरकीपटूंची जादू चालली होती, त्या खेळपट्टीवर भारताच्या जसप्रीत बुमराहने कहर केला. जसप्रीत बुमराहने एकूण ५ गडी बाद केले. कसोटी कारकिर्दीत त्याने कसोटी डावांत पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची ही आठवी वेळ ठरली. पण विशेष बाब म्हणजे जसप्रीत बुमराहने भारतात खेळताना पहिल्यांदाच एका डावात पाच बळी टिपले. त्यामुळे त्याची पत्नी संजना गणेशन हिने त्याचं अभिमानाने कौतुक केलं.

श्रीलंकेविरुद्धच्या बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने १० षटकात २४ धावा दिल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. या दरम्यान जसप्रीत बुमराहने आपल्या स्पेलमध्ये ४ मेडन ओव्हर्सही टाकली. त्याशिवाय भारताकडून मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक बळी मिळवला. बुमराहच्या कामगिरीवर त्याची पत्नी संजना खुश झाली. तिने अतिशय गोड शब्दात अभिमानाने आपल्या पतीचं कौतुक केलं.

जसप्रीत बुमराहने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आठव्यांदा पाच विकेट घेतल्यावर त्याची पत्नी संजना गणेशननेट्विटरवर प्रतिक्रिया दिली. संजनाने लिहिले की आठव्यांदा डावात पाच विकेट्स आणि मोजणी अजूनही सुरूच आहे... खूप अभिमान वाटतो. संजना गणेशन सध्या न्यूझीलंडमध्ये असून ती महिला विश्वचषकात अँकरिंग करत आहे.

बुमराहची पाच विकेट्स घेतल्याची कामगिरी

1. 27-6 वि वेस्ट इंडीज (किंग्स्टन)2. 33-6 वि ऑस्ट्रेलिया (मेलबर्न)3. 7-5 वि वेस्ट इंडीज (नॉर्थ साऊंड)4. 24-5 वि श्रीलंका (बेंगळुरू)5. 42-5 वि दक्षिण आफ्रिका (केपटाऊन)6. 54-5 वि दक्षिण आफ्रिका (जोहान्सबर्ग)7. 64-5 विरुद्ध इंग्लंड (नॉटिंगहॅम)8. 85-5 विरुद्ध इंग्लंड (नॉटिंगहॅम)

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाजसप्रित बुमराहसंजना गणेशनट्विटर
Open in App