Join us

या फोटोतील चिमुकला आहे जगातील सर्वोत्तम खेळाडू, ओळखा पाहू तो कोण?

सोशल मीडियावर सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. पण, हा फोटो नेमका कोणाचा आहे, हे ओळखणं कठीण होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 14:43 IST

Open in App

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. पण, हा फोटो नेमका कोणाचा आहे, हे ओळखणं कठीण होत आहे. भल्याभल्या क्रिकेट तज्ञांनाही हा मुलगा कोण आहे, यासाठी डोकं खाजवावं लागत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही विचार करत बसला असाल. चला तुम्हाला आम्ही एक हिंट देतो, हा लहान मुलाचा फोटो जगातील सर्वोत्तम खेळाडूंत अव्वल स्थानावर असलेल्या मुलाचा आहे. ज्याच्या तालावर दिग्गज फलंदाज नाचतात, गोलंदाजीच्या त्याच्या हटके शैलीनं जगाला वेड लावलं आहे, आताचा युवा खेळाडू त्याच्या शैलीची कॉपी करत आहे, त्याचा यॉर्कर म्हणजे यष्टिंचा वेध घेणाराच... अजून नाही कळलं कोण आहे हा? चला तर मग आता सांगून टाकतो...

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचा लहानपणीचा हा फोटो आहे. बुमराहनं अल्पावधीतच भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. तो संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये त्यानं आघाडीचं स्थानही पटकावलं आहे. जानेवारी 2016मध्ये बुमराहनं आंतरराष्ट्रीय वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2018मध्ये त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. पण, या तीन वर्षांच्या काळात बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. 25 वर्षीय गोलंदाजाने 12 कसोटीत 62, 58 वन डेत 103 आणि 42 ट्वेंटी-20 सामन्यांत 51 विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ