Join us

Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: जसप्रीत बुमराह लवकरच होणार बाबा? पत्नी संजना गणेसनचा WPL 2023 मधल्या Viral Photoची चर्चा

Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: बुमराह गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 14:25 IST

Open in App

Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan pregnant: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याच्या खराब फिटनेसमुळे तो क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे. त्यामुळे तो गेल्या वर्षीच्या आशिया चषक आणि टी२० विश्‍वचषकातही सहभागी होऊ शकला नाही. त्याचवेळी, त्याच्या दुखापतीबाबत काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की, त्याला फिट होण्यासाठी आणखी ६ महिने लागू शकतात. त्यामुळे यंदाचे IPL आणि WTC Final मधूनही तो जवळपास बाहेर गेला आहे. त्या दरम्यान, वुमेन्स प्रीमियर लीग (WPL 2023), त्याची पत्नी संजना गणेशन (संजना गणेशन) हिचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोतून असा दावा केला जात आहे की लवकरच, जसप्रीत बुमराह बाबा होणार असण्याले बोलले जात आहे.

टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन हे सर्वात जास्त चर्चेत असलेले जोडपे आहेत. हे सुंदर जोडपे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्याच वेळी WPL 2023 दरम्यान संजना गणेशनचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत असल्याचे बोलले जात आहे. तिच्याकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, तिचे हे छायाचित्र पाहिल्यानंतर ती लवकरच बाळाला जन्म देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे मार्च २०२१ मध्ये लग्न झाले होते. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात एका खाजगी समारंभात लग्न केले आणि त्यानंतर त्यांचा एक समारंभ गुरुद्वारामध्ये झाला. त्याच्या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक दिसले. दरम्यान, संजना गणेशन तिच्या कामात खूपच सक्रिय आहे. ती लग्नानंतरही आठवड्याभरातच कामावर परतली होती. सोशल मीडियावरही ती खूप फोटो शेअर करत असते.

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशनभारतीय क्रिकेट संघमहिला टी-२० क्रिकेट
Open in App