जसप्रीत बुमराह 'जगात भारी'! जिंकला ICCचा सर्वोकृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार; रचला मोठा इतिहास

Jasprit Bumrah, ICC Men Cricketer of the Year Award : एका वर्षात २ आयसीसी पुरस्कार जिंकणारा बुमराह जगातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:00 IST2025-01-28T19:58:01+5:302025-01-28T20:00:15+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah is awarded the Sir Garfield Sobers Award for ICC Men Cricketer of the Year | जसप्रीत बुमराह 'जगात भारी'! जिंकला ICCचा सर्वोकृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार; रचला मोठा इतिहास

जसप्रीत बुमराह 'जगात भारी'! जिंकला ICCचा सर्वोकृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार; रचला मोठा इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jasprit Bumrah, ICC Men Cricketer of the Year Award : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक पुरस्कारांच्या सर्व विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ICC क्रिकेटर ऑफ द इयरची क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा होती. आयसीसीने आता या पुरस्काराचा विजेताही जाहीर केला आहे. आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयरसाठी चार खेळाडूंमध्ये शर्यत होती, ज्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह इंग्लंडचा फलंदाज जो रूट, हॅरी ब्रूक आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड यांचा समावेश होता. त्यातून भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला यंदाचा सर्वोकृष्ट क्रिकेटपटू म्हणून पुरस्कार देण्यात आला.

जसप्रीत बुमराहची दमदार कामगिरी

जसप्रीत बुमराहसाठी २०२४ हे वर्ष खूप संस्मरणीय ठरले. गेल्या वर्षी त्याने एकही एकदिवसीय सामना खेळला नाही, परंतु तो कसोटी आणि टी२० मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. टीम इंडियाला १७ वर्षांनंतर टी२० विश्वचषक जिंकून देण्यात त्याने महत्त्वाचे योगदान दिले. या स्पर्धेत त्याने ८ सामन्यांमध्ये केवळ ४.१७च्या इकॉनॉमीने धावा केल्या आणि १५ बळी घेतले. तो सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला होता आणि सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीतही तो तिसऱ्या स्थानावर होता.

दुसरीकडे, जसप्रीत बुमराह गेल्या वर्षी कसोटीत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. जसप्रीत बुमराहने २०२४ मध्ये एकूण १३ कसोटी सामने खेळले. या काळात त्याने १५ च्या सरासरीने ७१ विकेट्स घेतल्या. गेल्या वर्षी तो कसोटी क्रिकेटमध्येही सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. गेल्या वर्षी घरच्या मैदानावर इंग्लंड आणि बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत संघाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही त्याने अप्रतिम कामगिरी करून दाखवली जाते.

बुमराहने जिंकला आणखी एक आयसीसी पुरस्कार

जसप्रीत बुमराहला गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरीसाठी ICC क्रिकेटर ऑफ द इयर तसेच ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाने हे ICC पुरस्कार जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. एका वर्षात २ आयसीसी पुरस्कार जिंकणारा बुमराह जगातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे.

Web Title: Jasprit Bumrah is awarded the Sir Garfield Sobers Award for ICC Men Cricketer of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.