नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक 2022 ला सुरूवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात झटका बसला आहे. विश्वचषकाची सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर झाला आहे. बुमराह मागील मोठ्या कालावधीपासून दुखापतीचा सामना करत आहे. खरं तर दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहला आशिया चषकातून देखील बाहेर व्हावे लागले होते.
दरम्यान, बुमराह आगामी विश्वचषकातून बाहेर झाल्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार सलमान बट्ट बुमराहच्या मदतीला धावून आला आहे. तसेच बुमराहच्या दुखापतीवरून त्याने भारतीय संघाच्या व्यवस्थापन समितीला इशारा दिला आहे. 
सलमान बट्टने त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटले, "जसप्रीत बुमराहची ॲक्शन अशी आहे की त्याचा पूर्ण लोड पाठीवरच पडतो. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. याशिवाय आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील तो खेळत असतो. बुमराह हा फेरारी कार, ॲस्टन मार्टिन किंवा लॅम्बोर्गिनीसारखा आहे. यापद्धतीने महागड्या गाड्यांचा वेग असतो. त्यांना वीकेंड कार म्हटले जाते. हे तुमच्या टोयोटा कोरोलासारखे नाही, जी दररोज आणि सगळीकडे चालवली जाऊ शकते." 
बुमराहला सांभाळून ठेवण्याची गरज 
"प्रत्येकजण ते स्क्रॅच करू शकतो. वीकेंड कार म्हणजे अर्थातच यांना वीकेंडलाच चालवायला हवे. बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजाला सांभाळून ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात त्याला खेळवणे टाळायला हवे", असे सलमान बट्टने म्हटले. 
विश्वचषकासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल,  भुवनेश्वर कुमार,  हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर. 
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना 
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम