Jasprit Bumrah Injured? MI Pacer Visits CoE Ahead of IPL 2026 : आयपीएल २०२६ स्पर्धेच्या नव्या हंगामाला अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरात सामील न होता बंगळुरुस्थित बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस (CoE) मध्ये पोहचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त आहे का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL 2026 स्पर्धेआधी जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त?
जसप्रीत बुमराह हा दुखापतीच्या समस्येमुळे बंगळुरु स्थित बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये पोहला की, नियमित तपासणीसाठी ही गोष्ट अद्यापही गुलदस्त्यातच आहे. MI च्या संघाने सरावाला सुरुवात केली असली तरी बुमराह अजून संघाचा भाग नाही. त्यात तो बंगळुरु स्थित पुनरवसन केंद्रात दिसल्यामुळे उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
IPL 2026: 'हा' नियम अष्टपैलू खेळाडूंसाठी विघ्न? रोहित, हार्दिकनंतर आता अक्षर पटेलही भडकला!
MI च्या प्रशिक्षकाने सांगितली होती आतली गोष्ट
याआधी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने याने एक खास गोष्ट शेअर केली होती. टी-२० वर्ल्ड कप संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना उशीराने संघात सामील होण्याची परवानगी दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. कदाचित याच कारणामुळे जसप्रीत बुमराह MI च्या ताफ्यात सामील झाला नसावा, ही देखील एक शक्यता असू शकते.
जसप्रीत बुमराह म्हणजे विजयाची हमी, पण ...
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बुमराहनं गत हंगामात १२ IPL सामन्यात १८ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराह म्हणजे विजयाची हमी, पण तो दुखापतग्रस्त असल्याची चर्चा रंगत असल्यामुळे त्याची संघाला उणीव भासणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुमराह फिट असला तरी आगामी वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंवरही विशेष भर देण्यात येणार आहे. त्यामुळे IPL मध्ये MI कडून किती सामने खेळणार हेही अजून गुलदस्त्यातच आहे.
Web Summary : Concerns rise for Mumbai Indians as Jasprit Bumrah visits BCCI's CoE instead of joining practice. Injury rumors swirl before IPL 2026. Despite previous coach statements about delayed joining for T20 World Cup players, his absence raises questions about fitness and workload management for future tournaments.
Web Summary : आईपीएल 2026 से पहले जसप्रीत बुमराह के अभ्यास में शामिल न होकर बीसीसीआई के सेंटर ऑफ एक्सीलेंस जाने से मुंबई इंडियंस की चिंता बढ़ी। चोट की अफवाहें उड़ीं। कोच के टी20 विश्व कप खिलाड़ियों के देर से शामिल होने के बयान के बावजूद, उनकी अनुपस्थिति फिटनेस और वर्कलोड पर सवाल उठाती है।