Join us

फिटनेस टेस्टसाठी जसप्रीत बुमराह बंगळुरु मुक्कामी! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो खेळणार की नाही?

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन वनडेत दिसणार नाही जसप्रीत बुमराह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:00 IST

Open in App

Jasprit Bumrah Fitness Update Ahead Of Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघातील स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी बंगळुरु स्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत (NCA) पोहचला आहे. रविवारी संध्याकाळीच जसप्रीत बुमराह त्या ठिकाणी पोहचला असून जवळपास पुढचे तीन दिवस तो नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये थांबेल, अशी चर्चा आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जसप्रीत बुमराहची फिटनेस चाचणी; तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळणार की, नाही?

बीसीसीआयच्या (BCCI) मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली त्याच्या फिटनेससंदर्भातील काही चाचण्या केल्या जाणार आहेत. यात स्कॅनचाही समावेस असेल. सर्व चाचण्या झाल्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकदामीकडून जसप्रीत बुमराहच्या फिटनेससंदर्भातील अपडेट्स बीसीसीआय निवड समितीला दिली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात जसप्रीत बुमराहचे नाव असले तरी त्याच्या रिपोर्ट्सनंतरच तो या स्पर्धेत खेळणार की नाही, ते स्पष्ट होणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्यादोन सामन्यात दिसणार नाही  बुमराह

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली त्यावेळी बीसीसीआय निवड समितीचे मुख्य अध्यक्ष  अजित आगरकर यांनी बुमराहच्या फिटनेससंदर्भात वक्तव्य केले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे अजित आगरकरांनी सांगितले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारतीय संघ घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह उपलब्ध नसेल.

बुमरासंदर्भात फायनल निर्णय घेण्यासाठी फारच कमी वेळ उरलाय

बीसीसीआय निवड समितीला जसप्रीत बुमराहसंदर्भातील निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम १५ सदस्यी संघाची यादी एका आठवड्याच्या आत आंतरारष्ट्रीय परिषदेकडे द्यायची आहे. त्यामुळेच बुमराह फिटनेस चाचणीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहचला आहे. जर तो अनफिट ठरला तर भारतीय संघाला त्याच्याशिवाय मैदानात उतरावे लागू शकते. या परिस्थितीत हर्षित राणाची टीम इंडियात एन्ट्री होऊ शकते. 

टॅग्स :जसप्रित बुमराहचॅम्पियन्स ट्रॉफीभारत विरूद्ध इंग्लंड २०२५बीसीसीआयआयसीसी