लखनौविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला. या सामन्यात बुमराहने फक्त २२ धाव देऊन चार विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह बुमराहने संघाचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडीत काढला आणि मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सकडून खेळताना सर्वाधिक १७१ विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीसह त्याने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला. मलिंगाने मुंबईसाठी १२२ सामन्यात १७० विकेट्स घेतल्या. या यादीत हरभजन सिंह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर मिचेल मॅकक्लेनाघन चौथ्या, कायरन पोलार्ड पाचव्या, हार्दिक पांड्या सहाव्या, कृणाल पांड्या सातव्या, ट्रेंट बोल्ड आठव्या, राहुल चहर नवव्या आणि मुनाफ पटेल दहाव्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज:
१) जसप्रीत बुमराह- १७१ विकेट्स२) लसिथ मलिंगा- १७० विकेट्स३) हरभजन सिंग- १२७ विकेट्स४) मिचेल मॅकक्लेनाघन- ७१ विकेट्स५) कायरन पोलार्ड- ६९ विकेट्स६) हार्दिक पांड्या- ६५ विकेट्स७) कृणाल पांड्या- ५१ विकेट्स८) ट्रेंट बोल्ट- ४८ विकेट्स९) राहुल चहर- ४१ विकेट्स१०) मुनाफ पटेल- ४० विकेट्स
बुमराहने ४ एप्रिल २०१३ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने ४ षटकांत ३२ धावा देत ३ विकेट्स घेतले. त्याने विराट कोहलीला बाद करून आयपीएलमधील पहिली विकेट घेतली. बुमराहने आयपीएलमध्ये दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्याही गोलंदाजासाठी हे संयुक्तपणे सर्वाधिक आहे.