Jasprit Bumrah Angry, IND vs AUS : भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही बरेच दिवसांनी खेळताना पाहता येणार आहे. जसप्रीत बुमराहला वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे तो चर्चेत आला आहे. बुमराह हा सहसा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. परंतु मुंबई विमानतळावर तो वेगळ्याच मूडमध्ये दिसला. जसप्रीत बुमराह मुंबई विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या कॅमेरामनवर रागावलेला दिसला. बुमराहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याचे फोटो काढणाऱ्या पापाराझींवर रागावल्याचे स्पष्ट दिसून आले.
नेमकं काय घडलं?
जसप्रीत बुमराह मुंबई विमानतळावरून बाहेर येताच तिथे उभे असलेले कॅमेरामन त्याच्या मार्गात अडथळे आणत होते. बुमराहने काहीसा चिडला आणि वैतागून म्हणाला, "मी तुम्हाला बोलवलं नाहीये... तुम्ही दुसऱ्या कुणासाठी तरी इथे आला असाल... तो दुसरा सेलिब्रिटी येतच असेल... त्याचे सेलिब्रिटीचे फोटो काढा..."
पापाराझी बुमराहला समजवत राहिले, पण...
बुमराहला वाटले की पापाराझी दुसऱ्याच एखाद्या सेलिब्रिटीसाठी विमानतळावर आले आहेत, म्हणून त्याने तसे म्हटले होते. पण एका पापाराझी कॅमेरामनने सांगितले, "तुम्ही आम्हाला आज इथे भेटलात हा आमच्यासाठी दिवाळी बोनस आहे. या कमेंटने बुमराहला आणखी चिडला. त्याने उत्तर दिले, "अरे बाबांनो, बाजूला व्हा... मला माझ्या कारकडे जाऊ दे."
बुमराह ऑस्ट्रेलियाला केव्हा जाणार?
जसप्रीत बुमराह लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आल्याने तो इतर खेळाडूंसोबत नाही. तो २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत खेळणार आहे. भारताचा वनडे संघ आधीच पर्थमध्ये पोहोचला आहे. १९ ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरू होईल. त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेला २९ ऑक्टोबरला कॅनबेरा येथून सुरूवात होईल.