Join us

Jasprit Bumrah, IPL 2022 MI vs KKR Video: बूम बूम बुमराह... फक्त ९ चेंडू अन् ५ बळी!दोन ओव्हरमध्ये Mumbai Indians कडे फिरवला अख्खा सामना

बुमराहने १८व्या षटकात एकही रन न देता घेतले तीन बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 22:08 IST

Open in App

Jasprit Bumrah Mumbai Indians, IPL 2022 MI vs KKR Video: मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात कोलकाताने २० षटकांत १६५ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या ४३, नितीश राणाच्या ४३, अजिंक्य रहाणेच्या २५ आणि रिंकू सिंगच्या नाबाद २३ धावांच्या बळावर कोलकाताने कशीबशी इतकी मजल मारली. या सामन्यात १४व्या षटकापर्यंत सामना कोलकाता नाईट रायडर्सकडे झुकला होता. त्यानंतर बुमराहने केवळ दोन षटकात अख्खा सामना मुंबई इंडियन्सच्या दिशेने फिरवला. त्याने १० धावांत ५ बळी घेतले. आतापर्यंतच्या IPL कारकिर्दीत बुमराहने पहिल्यांदा एका सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली.

बुमराहचे १० धावांत ५ बळी, पाहा व्हिडीओ-

कोलकाताचा संघ १५ षटकांत ३ बाद १३६ धावांवर होता. आंद्रे रसेल मैदानात होता, तसेच नितीश राणानेही चाळीशी पार केली होती. त्यावेळी जसप्रीत बुमराहने सामन्यात ट्विस्ट आणला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने रसेलला माघारी पाठवले. त्याच षटकात पाचव्या चेंडूवर सेट फलंदाज नितीश राणा बाद झाला. त्यानंतर १८व्या षटकात पहिल्या चेंडूवर बुमराहने शेल्डन जॅक्सनला, तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सला आणि चौथ्या चेंडूवर नरिनला बाद केले. त्यामुळे IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच जसप्रीत बुमराहने पाच बळी टिपला.

टॅग्स :आयपीएल २०२२जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App