Join us

जय शहा, सौरव गांगुली यांनी मैदान गाजवले, अटीतटीच्या लढतीत दादाच्या संघाचा पराभव

बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीपूर्वी अध्यक्ष एकादश आणि सचिव एकादश यांच्यात प्रदर्शनी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गांगुलीच्या अध्यक्ष एकादशचा जय शहा यांच्या सचिव एकादशने केवळ एका धावेने पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 09:49 IST

Open in App

कोलकाता : बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीपूर्वी अध्यक्ष एकादश आणि सचिव एकादश यांच्यात प्रदर्शनी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गांगुलीच्या अध्यक्ष एकादशचा जय शहा यांच्या सचिव एकादशने केवळ एका धावेने पराभव केला. १५ षटाकांच्या झालेल्या या सामन्यात जुन्या गांगुलीचे दर्शन झाले. त्याने २० चेंडू २ षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या. मात्र संघाला विजयी लक्ष्य गाठून देण्यात तो अपयशी ठरला. सचिव जय शहा यांनी प्रभावी फिरकी गोलंदाजी करत सात षटकांत ५८ धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. शहा यांच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १२८ धावांचे लक्ष्य उभारले होेते. मात्र गांगुलीचा संघ अवघ्या एका धावेने हे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला.

टॅग्स :बीसीसीआयसौरभ गांगुलीजय शाह
Open in App