Join us

सामन्यावर बहिष्कार टाकणे चुकीचे

बीसीसीआयने असा प्रयत्न केला तरी त्याचे बुमरँग होऊ नये यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. दुसरा पर्याय म्हणजे भारत स्वत: विश्वचषकात खेळणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 07:41 IST

Open in App

अयाझ मेमन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणावाचा परिणाम क्रिकेटच्या मैदानावरही दिसत आहे. सीओओ आणि बीसीसीआयचे अध्यक्ष यांच्यात आज दबाव टाकण्याबाबत चर्चा होणार होती. यात बीसीसीआय तीन पर्यायांचा विचार करत आहे. त्यात पहिला पर्याय म्हणजे बीसीसीआय आयसीसीला पाकिस्तानवर बंदी घालण्याबाबतचे पत्र देईल. हे खुप कठीण आहे. मला वाटते हे खुप कठीण आहे. एक आंतरराष्ट्रीय संघटना असा निर्णय घेणे कठीण आहे.

बीसीसीआयने असा प्रयत्न केला तरी त्याचे बुमरँग होऊ नये यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. दुसरा पर्याय म्हणजे भारत स्वत: विश्वचषकात खेळणार नाही. आणि तिसरा पर्याय म्हणजे पाकिस्तानविरोधातील सामने न खेळणे, मला वाटते हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. त्यामुळे पाकिस्तानला कोणताच फरक पडणार नाही. सामन्यावर बहिष्कार टाकल्यान पाकिस्तानचे नुकसान होणार नाही. स्पर्धेवर नक्कीच फरक पडेल. या दोन्ही देशांत द्विपक्षीय मालिका होत नाही. भारताने याबाबत आधीच ठोस भूमिका घेतली आहे.आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अशी भूमिका घेतल्यास पाकिस्तानचे नुकसान होणार नाही. भारत सरकार याबाबत योग्य ती भूमिका घेत आहे. आपण क्रिकेटला बळी बनवु नये. क्रिकेट खेळल्याने तुम्ही दहशतवादाविरोधात आवाज उचलत नाही, असे होत नाही.भारत आणि आॅस्ट्रेलिया मालिकेला रविवारपासून सुरूवात होत आहे. सर्वांचे लक्ष एकदिवसीय मालिकेवर असेल. संघ व्यवस्थापनाबाबत अजूनही प्रश्न आहेत. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे रवींद्र जडेजाला एक संधी मिळाली आहे. के.एल. राहूलला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संधी मिळाली आहे. संघात १२ जागा नक्की झाल्या आहेत. आता उर्वरीत जागांसाठी स्पर्धा सुरू आहेत. सध्या आॅस्ट्रेलियन खेळाडूंची लहान मुलांचा संघ म्हणून खिल्ली उडवली जात आहे. ही एक चांगला विनोद आहे. त्याला रिषभ पंत आणि टीम पेन यांच्यातील वादाची किनार आहे. मात्र त्याचा अर्थ असा नाही की आॅस्ट्रेलियन संघ चांगला खेळ करणार नाही. टी २० मध्ये तुम्ही कोणत्याही संघाला कमजोर समजू शकत नाही.विराट आणि जसप्रीत बुमराह हे संघात परतले आहेत. त्यामुळे संघाला नक्कीच मजबुती मिळाली आहे. भारतीय खेळपट्ट्यावर भारतीय खेळाडू नक्कीच चांगला खेळ करतात. हा भारतासाठी फायदा आहे.आॅस्ट्रेलियाचा संघ मजबूत मानला जात होता. सध्या विश्वविजेते आहेत. त्यांना एकजुट व्हावे लागेल. आॅस्ट्रेलिया सहज पराभूत होईल, असा समज भारतीयांंनी करुन घेऊ नये.भारताचे सलामीवीर किती मोठी भागिदारी करतात. याकडे सर्वांचे लक्ष असेल. सलामीवीरांच्या खेळावर मधल्या फळीतील फलंदाजांचे काम अवलंबून असते.राहूलला धावा करता आल्या नाही तर त्याचा पुढे संधी मिळणार नाही. त्याला निवड समितीने इशारा दिला आहे की, रिषभ पंत कोणत्याही स्थानावर खेळु शकतो. जडेजाला देखील संधी आहे. चहल आणि कुलदीप शिवाय आणखी एक फिरकीपटू येईल की केदार जाधवच ते काम करेल, या प्रश्नांचे उत्तर लवकर मिळेल.( लेखक लोकमत वृत्त समुहाचे संपादकीय सल्लागार आहेत )व्हिडीओसाठी पाहाhttps://www.facebook.com/lokmat/videos

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ