'हे एखाद्या कडू औषधासारखं...'; आरसीबीच्या पराभवानंतर एबी डिव्हिलियर्सने केलं भावनिक ट्विट

आरसीबीचा पराभव झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 01:55 PM2023-05-22T13:55:05+5:302023-05-22T13:58:47+5:30

whatsapp join usJoin us
'It's like a bitter medicine...'; AB de Villiers made an emotional tweet after RCB's Lose | 'हे एखाद्या कडू औषधासारखं...'; आरसीबीच्या पराभवानंतर एबी डिव्हिलियर्सने केलं भावनिक ट्विट

'हे एखाद्या कडू औषधासारखं...'; आरसीबीच्या पराभवानंतर एबी डिव्हिलियर्सने केलं भावनिक ट्विट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

प्ले ऑफसाठी विजय आवश्यक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) अखेर थोडक्यात अपयश आले. विराट कोहलीच्या विक्रमी शतकानंतर आरसीबीला शुभमन गिलच्या नाबाद शतकी तडाख्याचा सामना करावा लागला. या जोरावर गुजरात टायटन्सने ६ गड्यांनी बाजी मारताना आरसीबीला यंदाच्या आयपीएलमधून बाहेर केले. तसेच, गुजरातच्या विजयाचा फायदा झालेल्या मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसिससह मोहम्मद सिराज आणि विराट कोहली भावूक झाल्याचे दिसून आले. डग आऊटमध्ये बसलेला विराट कोहली शुभमन गिलच्या बॅटमधून निघालेला मॅच विनिंग सिक्स पाहून निराश झाला. यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी देखील आल्याचं दिसून आलं. विराट कोहलीने ख्रिस गेलला मागे टाकलं. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ सेंच्युरी झळकवणारा फलंदाज बनला आहे. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सुद्धा आहे. पण अजून विजेतेपद कोहलीच्या नशिबी आलेलं नाहीय.

आरसीबीचा पराभव झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केले. ट्विटरवर विराट कोहलीसह आरसीबी ट्रेंडिंगमध्ये पाहायला मिळाले. दक्षिण अफ्रिकेचा आणि आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने देखील आरसीबीच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे. एबी डिव्हिलियर्स ट्विट करत म्हणाला की, हे एखाद्या कडू औषधासारखे आहे, जे गिळण्यास कठीण आहे. आरसीबीने चांगला प्रयत्न केला. गिल आणि गुजरात टायटन्सचा शानदार खेळ दाखवला, असं एबी डिव्हिलियर्सने म्हटलं आहे. 

दरम्यान, रोमांचक झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) ६ गड्यांनी नमवले. यामुळे आरसीबीचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले असून गुजरातने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. याआधी झालेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादला ८ गड्यांनी नमवले होते. प्ले ऑफ गाठण्यासाठी आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. स्टार फलंदाज विराट कोहलीच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने जवळजवळ अर्धी लढाई जिंकली होती. परंतु, यानंतर शुभमन गिलने त्याच तोडीची खेळी करत नाबाद शतक झळकावत गुजरातला विजयी केले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर आरसीबीने २० षटकांत ५ बाद १९७ धावा केल्या. गुजरातने १९.१ षटकांत ४ बाद १९८ धावा केल्या.

GT vs CSK आणि  MI vs LSG-

गुजरातच्या विजयाने मुंबई इंडियन्स मात्र चौथ्या सीटवरून प्ले ऑफमध्ये पोहोचले. GT vs CSK यांच्यात क्वालिफायर १चा सामना २३ मे रोजी चेन्नईतील चेपॉकवर होणार आहे, तर २४ मे रोजी MI vs LSG अशी एलिमिनेटर लढत होईल. त्यानंतर क्वालिफायर २ सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २६ तारखेला होईल. यात क्वालिफायर १ मधील पराभूत आणि एलिमिनेटर मधील विजयी संघ खेळतील. २८ मे रोजी अहमदाबाद येथेच अंतिम सामना होईल. 

Web Title: 'It's like a bitter medicine...'; AB de Villiers made an emotional tweet after RCB's Lose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.