Join us

IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय

आयपीएल २०२५ पासून बीसीसीआयनं अशा खेळाडूंसाठी नवीन नियम बनवले आहेत जे मध्ये सामने सोडून त्यांच्या देशात परतात किंवा कुठल्या तरी बहाण्याने सामने स्कीप करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:10 IST

Open in App

नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे IPL सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता या दोन्ही देशात युद्धविराम झाल्यानंतर पुन्हा IPL सामने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. BCCI ने आयपीएलला स्थगिती दिल्याने बरेच परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतले आहेत. मात्र आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू झाला आहे. परंतु अनेक परदेशी खेळाडूंच्या परतण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यात बहुतांश ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. ज्यांनी तिथल्या स्थानिक मीडियाशी बोलताना भारतात परतण्यासाठी कुठलाही दबाव नसल्याचं म्हटलं. जर असे झाले तर BCCI ही त्यांच्या निर्णयासाठी तयार आहे.

IPL खेळायला न परतणाऱ्या खेळाडूंना BCCI बॅन करणार

आयपीएल २०२५ पासून बीसीसीआयनं अशा खेळाडूंसाठी नवीन नियम बनवले आहेत जे मध्ये सामने सोडून त्यांच्या देशात परतात किंवा कुठल्या तरी बहाण्याने सामने स्कीप करतात. यावेळी या परदेशी खेळाडूंवर बीसीसीआयने कठोर पावले उचलली आहेत. या खेळाडूंना बीसीसीआयने आयपीएलमध्ये २ वर्षाची बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. BCCI ने या नियमाचा वापर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवर केला आहे. आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंवरही अशीच कारवाई होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या परतण्यावर प्रश्नचिन्ह

आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा असताना असे कोण ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत ज्यांच्या परतण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत ते जाणून घेऊ. या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा समावेश आहे. मिडिया रिपोर्टनुसार, स्टार्कच्या मॅनेजरने याचे संकेत दिले आहेत की तो कदाचित भारतात परतणार नाही. याचप्रकारे खांद्याच्या दुखापतीमुळे जोश हेजलवुड याच्याही परतण्याची शक्यता कमी आहे. पॅट कमिंस, ट्रेविस हेड यांचीही हीच परिस्थिती आहे. आयपीएलमध्ये न परतण्यामागे WTC फायनलचेही कारण दिसून येते. ११ जूनपासून हे सामने सुरू होत आहेत त्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम ६ जूनला इंग्लंडला पोहचेल. ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनला त्यांचे महत्त्वाचे खेळाडू आयपीएल सामन्यांमुळे अनफिट आणि दुखापतग्रस्त व्हावेत असं वाटत नाही.

दरम्यान, IPL 2025 पुन्हा एकदा १६ मे पासून सुरू करण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. भारत सरकारनेही त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्याशिवाय आयपीएल सीरिज ३० मे पर्यंत वाढवण्याची चर्चा आहे. आयपीएलमध्ये अजून १७ सामने खेळणे बाकी आहे. ज्यात १३ ग्रुप स्टेज मॅच आहेत. या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू आले तर ठीक आहे परंतु जर ते परतले नाहीत तर बीसीसीआय त्यांच्याविरोधात कठोर निर्णय घेत त्यांच्यावर २ वर्ष बंदी आणू शकते. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५बीसीसीआयआॅस्ट्रेलिया