ICC T 20 World Cup 2026 Nepal vs Italy, 17th Match : मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात इंग्लंडच्या संघाला रडवणाऱ्या नेपाळला पराभवाचा धक्का देत इटलीच्या संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करत इतिहास रचला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना नेपाळच्या संघ १२३ धावांवर आटोपला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना इटलीच्या संघाकडून अँथोनी मोस्का आणि जस्टिन मोस्का या बंधूंनी संघाच्या डावाची सुरुवात केली. फुटबॉलमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या इटलीच्या संघाला पहिला विजय मिळवून देण्यासाठी या जोडीनं संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. या जोडीची फटकेबाजी म्हणजे दोन्ही भावांना चेंडू जणू फुटबॉलसारखाच दिसत असावा इतकी अप्रतिम होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोस्का ब्रदर्सचा हिट शो! दोघांनी नाबाद अर्धशतकासह जिंकून दिली मॅच
दोन्ही भावांनी नाबाद अर्धशतकासह संघाला पहिला आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला. क्रिकेटच्या मैदानात याआधीही भावा भावांची जोडी मैदानात एकत्र खेळताना दिसली आहे. पण सलामीला येऊन वर्ल्ड कप स्पर्धेत नाबाद अर्धशतकासह संघाला विजय मिळवून देण्याची ही पहिलीच वेळ ठरली. जस्टिन मोस्कानं ४४ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६० धावांची खेळी साकारली. दुसऱ्या बाजूला अँटनीने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची खेळी केली.
धोनीचा बायोपिक पाहिला अन् पाकिस्तानी सेल्समन नोकरी सोडून झाला क्रिकेटर, कोण आहे तो?
ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील मोस्का बंधूंनी सेट केला विक्रमी भागीदारीचा रेकॉर्ड
नेपाळच्या संघाविरुद्ध नाबाद १२४ धावांची भागीदारी रचत अँथोनी मोस्का आणि जस्टिन मोस्का यांनी संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. यासह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी रचणाऱ्या बंधूंच्या यादीत ही जोडी टॉपर ठरली आहे. याआधी पाकिस्तानच्या कमरान अकमल आणि उमर अकमल या भावाभावांनी २०१४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ९६ धावांची भागीदारी रचली होती. याशिवाय यंदाच्या हंगामात इटलीच्या संघातील हॅरी मानेंती आणि वेबन मानेंती यांनी स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात ७३ धावांची भागीदारी रतल्याचे पाहायला मिळाले होते.
क्रिशन कलुगमेजचा जलवा
इटलीच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. वानखेडेच्या मैदानात नेपाळच्या संघाने इंग्लंडविरुद्धचा सामना फक्त ४ धावांनी गमवाला होता. त्यामुळे पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा खेळणाऱ्या इटलीसमोर तेच भारी ठरतील, असे वाटत होते. पण क्रिशन कलुगमेज याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेत आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. त्याशिवाय बेन मोनेंती याने २ तर विकेट्स घेतल्या.अली हसन आणि जेजे स्मुट्स आणि जसप्रीत सिंग यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत नेपाळच्या संघाला अवघ्या १२३ धावांवर रोखले.
Web Summary : Italy secured a historic first T20 World Cup win, defeating Nepal after restricting them to 123. The Mosca brothers, Anthony and Justin, led Italy's chase with unbeaten half-centuries, delivering a memorable victory.
Web Summary : इटली ने नेपाल को हराकर टी20 विश्व कप में पहली ऐतिहासिक जीत दर्ज की। नेपाल को 123 रनों पर रोकने के बाद, मोस्का बंधुओं, एंथनी और जस्टिन ने नाबाद अर्धशतक बनाकर इटली को यादगार जीत दिलाई।