Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!

नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:42 IST

Open in App

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या  टी-20 लीग बिग बॅश लीग (BBL) स्पर्धेत सध्या चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. २७ डिसेंबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ब्रिस्बेन हीट आणि अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या हंगामात पाकिस्तानचा कर्णधार आणि स्टार जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी ब्रिस्बेन हीट संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात इटालियन खेळाडूने त्याची चांगलीच धुलाई केली. या षटकानंतर पाकिस्तानी गोलंदाजावर लंगडत लंगडत मैदान सोडण्याची वेळ आल्याचेही पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हॅरी मॅनेंटीने केली शाहीन आफ्रिदीची धुलाई

या सामन्यात इटलीचा खेळाडू हॅरी मॅनेंटी याने शाहीन आफ्रिदीची चांगलीच धुलाई केली. एका ओव्हरमध्ये मॅनेंटीने सलग तीन चौकार ठोकत शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर अक्षरश: तुटून पडल्याचे पाहायला मिळाले. ब्रिस्बेन हीटनं हा सामना अवघ्या ७ धावांनी जिंकला. पण या सामन्यात आफ्रिदीला काही  जलवा दाखवता आला नाही. इटलीच्या गोलंदाजाकडून धुलाई झाल्याचा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात षटक पूर्ण केल्यावर त्याने मैदानही सोडले. खरंच तो दुखापतीनं त्रस्त होता की, इटलीच्या बॅटरनं धुलाई केल्यामुळे त्याने नौटंकी केली, हा देखील मुद्दा चर्चेचा ठरताना दिसते. 

Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO

पदार्पणाच्या सामन्यातही चांगलेच चोपले, त्यात आणखी एका षटकाची भर

या सामन्यात शाहीन आफ्रिदीने  पहिल्या दोन षटकात फक्त ७ धावा दिल्या होत्या.  १२ व्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीला आला. पण या षटकात त्याने १९ धाव खर्च केल्या. षटक टाकून झाल्यावर फिल्डिंग करताना तो लंगडताना दिसले. एवढेच नाही तर त्याने लंगडत लंगडतच मैदान सोडले. त्याने ३ षटकात २६ धावा खर्च केल्या. BBL च्या पदार्पणातील सामन्यात शाहीन शाह आफ्रिदी चांगलाच महागडा ठरला होता. २.४ षटकात एकही विकेट न घेता त्याने ४३ धावा खर्च केल्या होत्या. त्यात आता आणखी एका महागड्या षटकाची भर पडली आहे. आतापर्यंत बीबीएलच्या या हंगामात पाकिस्तानी गोलंदाजाने ४ सामने खेळले असून केवळ २ विकेट्स घेतल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Shaheen Afridi hammered in BBL, limps off field after expensive over.

Web Summary : Italian batter Harry Manenti thrashed Shaheen Afridi in the BBL, hitting three consecutive fours. Afridi, already struggling, left the field limping after conceding 19 runs in one over. His expensive spell added to a disappointing BBL season.
टॅग्स :टी-20 क्रिकेटपाकिस्तान