Join us  

इशांत शर्मा म्हणतो, तर बायको माझा मर्डरच करेल

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 2:08 PM

Open in App

नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागले आहे. दरम्याम, न्यूझीलंडचा दौरा हुकल्याने इशांत सध्या फावल्या वेळेचा आनंद घेत आहे. त्यातच त्याने सोशल मीडियावरील एका चॅलेंजमध्ये सहभाग नोंदवला असून, त्यात त्याने सोशल मीडियावरच्या चार साईइट्सवर अपलोड करण्यासाठी आपले विविध शैलीतील फोटो शेअर केले आहेत. मात्र टिंडर या साईटवर टाकण्यासाठी मात्र इशांतने आपल्या पत्नी सोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच जर मी टिंडरवर आहे असं कळलं तर माझी पत्नी निश्चितपणे माझा मर्डर करेल अशी गमतीदार प्रतिक्रिया इशांतने व्यक्त केली आहे. हॉलीवूडमधील डॉली पार्टोन यांनी सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड सुरू केला आहे. त्यामध्ये लिंकडिन, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि टिंडर अशा चार सोशल मीडिया साईटवर अपलोड करण्यासाठी फोटो टाकण्याचे हे चॅलेंज आहे. दरम्यान, या चॅलेंजला सुरुवात झाल्यापासून अनेक सेलेब्रिटींनी आपापले फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे. 

त्यातच इशांत शर्मानेही आपले चार खास फोटो शेअर करून या चॅलेंजमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यात त्याने लिंकडिन, फेसबूक, इन्स्टाग्रामच्या प्रोफाइलसाठी स्वत:चे फोटो शेअर केले आहेत. मात्र टिंडर अॅपसाठी इशांतने आपल्या लग्नातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये इशांत त्याच्या पत्नीसह दिसत आहे. ''मी माझ्या वैवाहिक जीववनात आनंदी आहे. मात्र मी टिंडरवर आहे हे समजल्यास माझी पत्नी निश्चितपणे माझी मर्डर करेल, असे इशांतने म्हटले आहे. 

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का; 'हा' स्टार वेगवान गोलंदाज झाला जखमी

इशांत शर्माचा 'त्या' सुंदरीबरोबरचा स्विमिंग पुलमधला फोटो झालाय वायरल...

'या' क्रिकेटपटूंच्या बायका बॉलीवूड सेलिब्रेटींनाही सुंदरतेच्या बाबतीत टाकतील मागेइशांत शर्माने आतापर्यंत 96 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने प्रतिमा सिंह हिच्यासोबत विवाह केला होता. इशांतची पत्नी  तिमा सिंह बास्केटबॉलपटू आहे.  

टॅग्स :इशांत शर्मापरिवारसोशल मीडिया