Join us  

Ishan Kishan: ईशान किशन होणार महेंद्रसिंग धोनीचा 'शेजारी', 1.5 एकरमध्ये उभारणार बंगला 

अलीकडेच द्विशतक झळकावणारा ईशान किशन मायदेशात परतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:56 PM

Open in App

रांची : भारतीय संघाने अलीकडेच बांगलादेशविरूद्ध वन डे मालिका खेळली. खरं ती मालिका यजमान संघाने 2-1 ने जिंकली मात्र भारताच्या ईशान किशनने अखेरच्या सामन्यात द्विशतक ठोकून इतिहास रचला. आता किशन आपल्या मायदेशात परतला असून कुटुंबीयांसोबत रांची येथे आहे. लक्षणीय बाब म्हणजे तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा शेजारी होणार आहे. त्याने धोनीच्या पाऊलावर पाऊल टाकत एक मोठा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, ईशान किशनने पायाभूत सुविधांच्या विकासाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ईशानने रांचीमध्ये भूमिपूजनही केले असून त्यावर काम सुरू झाले आहे. ईशान किशनने बुधवारी संध्याकाळी रांचीजवळील सिमलिया रिंग रोडवर धोनीच्या फार्म हाऊसजवळ असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाशेजारी नव्या घरासाठी भूमिपूजन केले.

किशन होणार धोनीचा 'शेजारीभूमिपूजनानंतर क्रिकेटपटू ईशान किशनने माध्यमांशी संवाद साधताना बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावण्याचा अनुभव शेअर केला. यासोबतच बिहार आणि झारखंडचा रहिवासी असल्याने तो म्हणाला, "मी दोन्ही राज्यांचा पुत्र आहे मात्र, सर्वप्रथम मी देशाचा पुत्र आहे. विहार माझी जन्मभूमी आहे, तिथे माझे कुटुंबीय राहतात, जर क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर झारखंड हे माझ्यासाठी क्रिकेटची कर्मभूमी आहे, जिथे मी खूप काही शिकलो आहे." यावेळी किशनचे मित्र देखील उपस्थित होते.

चांगलं घर बांगण्याचं होतं स्वप्न खरं तर ईशान किशन शगुन आणि ईशान इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हा प्रकल्प विकसित करत आहेत. दलदली चौक, रिंग रोड, रांचीच्या आधी इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ त्याने आपल्या नवीन योजनेचे भूमिपूज केले आहे. हा नवीन प्रकल्प भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या सिमलिया हाऊस येथील फार्म हाऊसला लागून आहे.

1.5 एकरमध्ये उभारणार बंगला या प्रोजेक्टमध्ये स्विमिंग पूल, जिम, गेस्ट हाऊस, कम्युनिटी हॉल, गार्डन, सलून-पार्लर, डिपार्टमेंटल स्टोअर, मेडिकल स्टोअर, मंदिर, खेळाचे मैदान, स्पा आणि इनडोअर गेम्स याशिवाय इतर अनेक व्यवस्था असणार आहेत. दीड एकर परिसरात पसरलेल्या या प्रकल्पाचे भूमिपूजन ईशान किशन याच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजनानंतर ईशान म्हणाला की, त्याला छान आणि सुंदर घरात राहण्याची आवड आहे. त्यामुळेच त्याने पायाभूत सुविधांच्या विकासाचे क्षेत्र निवडले, जेणेकरून सर्व सुविधा उपलब्ध असतील असे घर मिळावे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :इशान किशनरांचीमहेंद्रसिंग धोनीचेन्नईभारतीय क्रिकेट संघ
Open in App