Join us

IPL 2022 Auction: भारताच्या 'या' स्टार खेळाडूनं भररस्त्यात खाल्ला होता मार; IPLमध्ये झाला मालामाल

IPL 2022 Auction: खेळाडूला भररस्त्यात खावा लागला होता गर्दीचा मार; आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 20:16 IST

Open in App

मुंबई: आयपीएलमधील स्टार खेळाडू इशान किशनलामुंबई इंडियन्सला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इशानसाठी मुंबईनं जोरदार बोली लावली. मुंबईनं इशानला आपल्याकडे खेचण्यासाठी १५ कोटी २५ लाख रुपये मोजले.

सहा वर्षांपूर्वी एका कार अपघातानंतर इशानला लोकांनी मारहाण केली होती. त्यावेळी इशान भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार होता. इशानच्या कारनं भरधाव वेगात एका रिक्षाला धडक दिली. त्यामुळे रिक्षातील प्रवासी जखमी झाले. अपघातग्रस्त गाडी इशानचे वडील चालवत होते. ह प्रकरण पोलीस ठाण्याच्या बाहेरचं मिटलं. जखमी व्यक्ती आणि इशानच्या कुटुंबात समेट झाल्यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाही.

इशानची कार रिक्षाला धडकताच रस्त्यावर गर्दी जमली. इशानचा उपस्थितांशी वाद झाला. प्रकरण धक्काबुक्कीनंतर हाणामारीपर्यंत गेलं. त्यावेळी गर्दीनं इशानला बरीच मारहाण केली होती. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचत गर्दीला शांत केलं. त्यामुळे प्रकरणाला पूर्णविराम मिळाला.

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सइशान किशन
Open in App