Ishan Kishan Led Jharkhand Create History Win Syed Mushtaq Ali Trophy First Time : झारखंडच्या संघाने पुण्याच्या मैदानात रंगलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये हरयाणाला पराभूत करत इतिहास रचला आहे. फायनल लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार ईशान किशन आणि कुमार कुशाग्रच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर झारखंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ३ बाद २६२ धावा केल्या. विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करण हरयाणाच्या संघाला जमलं नाही. फलंदाजीतील धमाकेदार कामगिरीनंतर गोलंदाजीतील धार दाखवून अखेर झारखंडच्या संघाने पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. झारखंड हा ही स्पर्धा जिंकणारा १२ वा संघ ठरला आहे.
झारखंडच्या संघाकडून कर्णधार ईशान किशन याने ४९ चेंडूत १०१ धावांची सर्वोच्च खेळी केली. याशिवाय कुमार कुशाग्रच्या भात्यातून ३८ चेंडूत ८१ धावांची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. या दोघांच्या तुफान फटकेबाजीनंतर अनुकूल रॉय ४० (२०) आणि रॉबिन मिंझ ३१ (१४) यांनीही २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा करत संघाच्या धावफलकावर ३ बाद २६२ धावा लावल्या होत्या. हरयाणाकडून अंशुल कंबोज, सुमित कुमार आणि समंत जखर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. पण जे गोलंदाजीला आले त्यांनी झारखंढच्या फलंदाजांनी धुलाई केली.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील आतापर्यंतचे विजेते
- २०२५–२६ – झारखंड
- २०२४–२५ – मुंबई
- २०२३–२४ – पंजाब
- २०२२–२३ – मुंबई
- २०२१–२२ – तमिळनाडू
- २०२०–२१ – तमिळनाडू
- २०१९–२० – कर्नाटक
- २०१८–१९ – कर्नाटक
- २०१७–१८ – दिल्ली
- २०१६–१७ – ईस्ट झोन
- २०१६–१७ – मध्य प्रदेश (इंटर-स्टेट टी-२०)
- २०१५–१६ – उत्तर प्रदेश
- २०१४–१५ – गुजरात
- २०१३–१४ – बडोदा
- २०१२–१३ – गुजरात
- २०११–१२ – बडोदा
- २०१०–११ – बंगाल
- २००९–१० – महाराष्ट्र
- २००६–०७ – तमिळनाडू
Web Summary : Ishan Kishan's captaincy led Jharkhand to a historic Syed Mushtaq Ali Trophy win, defeating Haryana. Kishan's century and Kushagra's 81 powered Jharkhand to 262/3. Jharkhand's bowling sealed their maiden title victory.
Web Summary : ईशान किशन की कप्तानी में झारखंड ने हरियाणा को हराकर ऐतिहासिक सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जीती। किशन के शतक और कुशाग्र के 81 रनों ने झारखंड को 262/3 तक पहुंचाया। झारखंड की गेंदबाजी ने पहली बार खिताब जीता।