SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी

पहिल्यांदा फायनल गाठली अन् ट्रॉफीही जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 20:19 IST2025-12-18T20:18:12+5:302025-12-18T20:19:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ishan Kishan Led Jharkhand Create History Win Syed Mushtaq Ali Trophy First Time Beating Haryana In Final | SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी

SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी

Ishan Kishan Led Jharkhand Create History Win Syed Mushtaq Ali Trophy First Time : झारखंडच्या संघाने पुण्याच्या मैदानात रंगलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये हरयाणाला पराभूत करत इतिहास रचला आहे. फायनल लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार ईशान किशन आणि कुमार कुशाग्रच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर झारखंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ३ बाद २६२ धावा केल्या. विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करण हरयाणाच्या संघाला जमलं नाही. फलंदाजीतील धमाकेदार कामगिरीनंतर गोलंदाजीतील धार दाखवून अखेर झारखंडच्या संघाने पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. झारखंड हा ही स्पर्धा जिंकणारा १२ वा संघ ठरला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 

ईशान-कुशाग्रसह अनुकूल आणि रॉबिन मिंझचा धमाका

झारखंडच्या संघाकडून कर्णधार ईशान किशन याने ४९ चेंडूत १०१ धावांची सर्वोच्च खेळी केली. याशिवाय कुमार कुशाग्रच्या भात्यातून ३८ चेंडूत ८१ धावांची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. या दोघांच्या तुफान फटकेबाजीनंतर अनुकूल रॉय ४० (२०) आणि रॉबिन मिंझ ३१ (१४) यांनीही २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा करत संघाच्या धावफलकावर ३ बाद २६२ धावा लावल्या होत्या. हरयाणाकडून  अंशुल कंबोज, सुमित कुमार आणि समंत जखर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. पण जे गोलंदाजीला आले त्यांनी झारखंडच्या फलंदाजांनी धुलाई केली. 

Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड

हरयाणाच्या संघाने पहिल्याच षटकात कॅप्टन्सह दोन विकेट गमावल्या अन्...

विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणारा हरयाणाचा कर्णधार अंकित कुमार पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या आशिष सिवाच यालाही विकास सिंह याने खाते उघडू दिले नाही. पहिल्याच षटकात दोन विकेट गमावल्यामुळे हरयाणा संघ बॅकफूटवर गेला. यशवर्धन दलाल याने २२ चेंडूत केलेल्या ५३ धावांसह निशांत संधू  ३१ (१५) आणि समंत जाखर ३८ (१७) यांच्याशिवाय अन्य कुणालाही मैदानात तग धरता आला नाही.  परिणामी हरयाणाचा डाव १८. ३ षटकात १९३ धावांवर आटोपला. झारखंडच्या संघाकडून बालकृष्ण, सुशांत शर्मा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय अनुकूल रॉय आणि विकस सिंह यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेत संघाला पहिले जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील आतापर्यंतचे विजेते

  • २०२५–२६ –  झारखंड 
  • २०२४–२५ – मुंबई  
  • २०२३–२४ – पंजाब  
  • २०२२–२३ – मुंबई  
  • २०२१–२२ – तमिळनाडू 
  • २०२०–२१ – तमिळनाडू 
  • २०१९–२० – कर्नाटक 
  • २०१८–१९ – कर्नाटक  
  • २०१७–१८ – दिल्ली 
  • २०१६–१७ – ईस्ट झोन 
  • २०१६–१७ – मध्य प्रदेश (इंटर-स्टेट टी-२०)
  • २०१५–१६ – उत्तर प्रदेश  
  • २०१४–१५ – गुजरात  
  • २०१३–१४ – बडोदा 
  • २०१२–१३ – गुजरात 
  • २०११–१२ – बडोदा  
  • २०१०–११ – बंगाल 
  • २००९–१० – महाराष्ट्र 
  • २००६–०७ – तमिळनाडू  

Web Title : ईशान किशन की कप्तानी में झारखंड ने जीता सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025

Web Summary : ईशान किशन की कप्तानी में झारखंड ने हरियाणा को हराकर ऐतिहासिक सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जीती। किशन के शतक और कुशाग्र के 81 रनों ने झारखंड को 262/3 तक पहुंचाया। झारखंड की गेंदबाजी ने पहली बार खिताब जीता।

Web Title : Jharkhand wins Syed Mushtaq Ali Trophy 2025 under Ishan Kishan

Web Summary : Ishan Kishan's captaincy led Jharkhand to a historic Syed Mushtaq Ali Trophy win, defeating Haryana. Kishan's century and Kushagra's 81 powered Jharkhand to 262/3. Jharkhand's bowling sealed their maiden title victory.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.