ICC T20I Rankings : टीम इंडियाला भिडण्याआधी सिकंदर रझाची 'नंबर वन' कामगिरी! अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा!

ICC T20I Rankings : गोलंदाजीत वरुण 'नंबर वन'; दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशची 'उंच उडी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:10 IST2026-02-25T16:05:08+5:302026-02-25T16:10:16+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ishan Kishan Huge Jump In ICC T20I Rankings Latest Update Join Abhishek Sharma In Top 5 Sahibzada Farhan Jasprit Bumrah Zimbabwe's Sikandar Raza Became Number 1 All Rounder | ICC T20I Rankings : टीम इंडियाला भिडण्याआधी सिकंदर रझाची 'नंबर वन' कामगिरी! अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा!

ICC T20I Rankings : टीम इंडियाला भिडण्याआधी सिकंदर रझाची 'नंबर वन' कामगिरी! अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा!

ICC T20I Rankings Latest Update : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धीतल सुपर ८ चा थरार सुरु असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) बुधवारी २५ फेब्रुवारीला आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या ईशान किशनसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान याने आगेकूच केली आहे. या नव्या क्रमवारीत भारताचा युवा बॅटर अभिषेक शर्मा अजूनही अव्वलस्थानी आहे. पण त्याचे नंबर वन स्थान धोक्यात आले  आहे. दुसरीकडे टीम इंडियाला भिडण्याआधी झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझानं अष्टपैलूंच्या गटात 'नंबर वन'चा डाव साधला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

अभिषेक शर्मासाठी पाकिस्तानी बॅटर ठरू धोकादायक

टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या हंगामात पाकिस्तानचा बॅटर साहिबजादा फरहान हा कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाविरुद्ध झिरो ठरेलेल्या या बॅटरनं यंदाच्या हंगामात आतापर्यंत २८३ धावा काढल्या आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी आहे. दमदार कामगिरीसह ICC क्रमवारीत तो अभिषेक शर्माला टक्कर देताना दिसत आहे. भारतीय बॅटरन यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. परिणामी तो 'नंबर वन' असला तरी त्याचे रेटिंग ८९१ वरून घसरून ८७७ वर आले आहे.

T20 World Cup 2026: सुपरफास्ट शतक, सर्वात मोठी खेळी, कर्णधार म्हणूनही विशेष कामगिरी; एकाच सामन्यात मोडले अन...

ईशान किशनसह साहिबजादा दोघेही फायद्यात 

अभिषेक शर्मापाठोपाठ इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट ८१५ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर फरहान ८१० रेटिंगसह रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ईशान किशन याने ७४२ रेटिंगसह आघाडीच्या पाचमध्ये एन्ट्री  मारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डेवॉल्ड ब्रेविसला भारतीय संघाविरुद्धच्या कामगिरीचा फायदा झाला असून तो १० स्थानांनी झेप घेत नवव्या स्थानावर पोहचला आहे.

गोलंदाजीत वरुण 'नंबर वन'; दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशची 'उंच उडी'

गोलंदाजी क्रमवारीत भारताचा वरुण चक्रवर्ती अव्वलस्थानी कायम आहे. इथं दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉश याने उंच उंडी मारत २१ स्थानांच्या सुधारणेसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या मॅथ्यू फोर्डे याने २३ स्थानांची झेप घेत सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दमदार कामगिरीच्या जोरावर टॉप १० मध्ये एन्ट्री मारली असून तो आता आठव्या क्रमांकावर आहे.

  टीम इंडियाला भिडण्याआधी सिकंदर रझाची 'नंबर वन' कामगिरी

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याने पाकिस्तानच्या सईम अयूब (Saim Ayub) याला मागे टाकत पुन्हा नंबर वनचा ताज आपल्याकडे घेतला.  सिकंदर रझाच्या दमदार कामगिरीमुळेच झिम्बाब्वे संघाला सुपर-८ मध्ये स्थान मिळवता आले. टीम इंडियाला भिडण्याआधी रझानं  'नंबर वन'चा  डाव साधला आहे. याचा झिम्बाब्वेसह त्याला कितपत फायदा होणार? ते पाहण्याजोगे असेल.

Web Title : आईसीसी टी20आई रैंकिंग: रजा शीर्ष पर; शर्मा का नंबर 1 स्थान खतरे में!

Web Summary : भारत से पहले सिकंदर रजा आईसीसी टी20आई ऑलराउंडर रैंकिंग में शीर्ष पर। अभिषेक शर्मा का शीर्ष बल्लेबाजी स्थान पाकिस्तान के साहिबजादा फरहान से खतरे में। वरुण चक्रवर्ती शीर्ष गेंदबाज बने हुए हैं। कोर्बिन बॉश तीसरे स्थान पर पहुंचे।

Web Title : ICC T20I Rankings: Raza tops; Sharma's No. 1 spot in danger!

Web Summary : Sikandar Raza leads ICC T20I all-rounder rankings before facing India. Abhishek Sharma's top batting rank is threatened by Pakistan's Sahibzada Farhan. Varun Chakravarthy remains top bowler. Corbin Bosch jumps to third.