Join us

आयला... सचिन की स्टीव्ह स्मिथ? सोशल चर्चा अन् रोहित शर्माची मजेशीर प्रतिक्रिया, Video 

sachin tendulkar’s statue - क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 15:51 IST

Open in App

sachin tendulkar’s statue - क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी दस्तुरखुद्द सचिनसह त्याचे कुटुंबीय, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, खजिनदार आशिष शेलार आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एकूण २२ फूट उंचीचा असलेला सचिनचा हा पुतळा सरळ दिशेने हवेत फटका मारतानाच्या शैलीत आहे. विजय मर्चंट स्टँड आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा बसविण्यात आला असून संपूर्ण पुतळा ब्राँझचा आहे.

आधी मिठी अन्...! विराट कोहलीने मैदानावर उतरून मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, Video  

 या कार्यक्रमानंतर सचिन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियमवरील आपल्या पहिल्या भेटीची मजेशीर आठवण सागितली. 'मी दहा वर्षांचा असताना पहिल्यांदा वानखेडे स्टेडियमवर आलो होतो आणि तेव्हा मला लपवून आणण्यात आले होते,' अशी आठवण सचिनने सांगितली. पण, आज या पुतळ्यावरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले आहेत. हा सचिनचा पुतळा आहे की स्टीव्ह स्मिथचा असे अनेकांनी विचारले आहे.  पुतळ्याचे अनावरण सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माला या पुतळ्याबाबत विचारले गेले. तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिले. 

टॅग्स :सचिन तेंडुलकररोहित शर्माऑफ द फिल्डस्टीव्हन स्मिथसोशल मीडिया