Join us

..म्हणून इरफान पठाणने श्रीनगर सोडलं

दहशतवादी हल्याची भीती आणि नियंत्रण सीमेवरील वाढत्या तणावामुळे काश्मीरमध्ये महत्वपूर्ण आस्थापने व संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 11:02 IST

Open in App

श्रीनगर: दहशतवादी हल्याची भीती आणि नियंत्रण सीमेवरील वाढत्या तणावामुळे काश्मीरमध्ये महत्वपूर्ण आस्थापने व संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तणावाची स्थिती पाहता तेथील स्थानिक नागरिकांनी घरांमध्ये लागणाऱ्या जीवनावश्क वस्तू साठविण्यासाठी दुकाने आणि पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

त्याचप्रमाणे जम्मू- काश्मीर क्रिकेट टीमची निवड व मार्गदर्शन करण्यासाठी गेलेला भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठान याने देखील इतर खेळाडूंसोबत श्रीनगर सोडले आहे. इरफान 16 वयोगटातील ( विजय मर्चेंट ट्राफी) आणि 19 वयोगटातील ( कूचबिहार ट्राफी) स्थानिक खेळाडूंची निवड करण्यासाठी श्रीनगरमध्ये गेला होता.

इरफानने सांगितले की, आम्ही कनिष्ठ ट्रायल्सच्या संघाच्या दूसऱ्या निवड चाचणीला थांबविले आहे. तसेच माझी जम्मू- काश्मीर क्रिकेट असोशिएशन सोबत बैठक झाली असून खबरदारी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने क्रिकेटपटूंनाही परतण्यास सांगण्यात आले आहे. 

अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यानंतर अब्दुल्ला यांनी राज्यातील जनतेला शांत राहण्याचं आवाहन केलं. काल मध्यरात्री श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं असून आज सकाळी ६ वाजल्यापासून जम्मूतही कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

     

टॅग्स :जम्मू-काश्मीरभारत